Apurva Nemlekar : ‘रावरंभा’ (Raavrambha) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आपल्या अभिनयाने आणि बिनधास्त स्वभावावाने कायम चर्चेत असणारी अण्णांची शेवंता (Apurva Nemlekar) ‘रावरंभा’ या सिनेमात ‘शाहीनआपा’ च्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे.
अपूर्वाने शाहीनआपाचा लुक सध्या तिच्या इन्स्टावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, आतापर्यंत माझ्या अनेक भूमिकांवर तुम्ही अतोनात प्रेम केलं आहे. अशीच एक आगळीवेगळी भूमिका आता मी साकारली आहे. शाहीनआपा येतेय येत्या १२ मे ला प्रदर्शित होणाऱ्या ‘रावरंभा’ या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
शेवंताच्या भूमिकेतून प्रत्येकांच्या घराघरात पोहोचलेली अपूर्वा आता एका अनोख्या अंदाजात दिसून येनंतर आहे. आरस्पानी सौंदर्य आणि धारदार नजर यांचा सुरेख मिलाप असणारी करारी बाण्याची ‘शाहीन आपा’ ही भूमिका अपूर्वा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘रावरंभा’ या सिनेमातून दिसून येणार आहे.
शाहीनआपाबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली, शिवछत्रपतींच्या कार्याला छुपी मदत करणारी ‘शाहीन आपा’ ही अतिशय महत्वाची ऐतिहासिक सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला असलयाचे तिने यावेळी सांगितले आहे. या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते. माझी ही भूमिका चाहत्यांना नक्कीच आवडणार असलायचा विश्वास तिने यावेळी दाखविला आहे. मला स्वत:लाही काही वेगळं केल्याचे समाधान या भूमिकेने दिले असल्याचे सांगितले आहे.
‘रावरंभा’ हा सिनेमा येत्या 12 मेला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अनुप जगदाळे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमामध्ये छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसून येणार आहेत. या चित्रपटातील गाणी गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धनने यांनी लिहली आहे.
आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारा ओम भूतकर (Om Bhutkar) आणि सौंदर्याबरोबर आपल्या अभिनयाने चाहत्यांवर मोठी छाप सोडणारी मोनालिसा बागल (Monalisa Bagal) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धनने ‘रावरंभा’ या सिनेमातील गाणी लिहिली आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत, हे सिनेमे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. आता ‘रावरंभा’ या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे.