Celina Jaitly: ‘मी घर जावई व्हायला तयार, माझ्याशी लग्न कर’..तर अभिनेत्रीनं दिलं ‘रोमँटिक’ उत्तर

Celina Jaitly: ‘मी घर जावई व्हायला तयार, माझ्याशी लग्न कर’..तर अभिनेत्रीनं दिलं ‘रोमँटिक’ उत्तर

Celina Jaitly On Fans Marriage Proposal: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सेलिना जेटलीनं (Celina Jaitly) अनेक चित्रपटांमध्ये चांगले काम केले आहे. जानशीन या चित्रपटाने सेलिनाला मोठी लोकप्रियता मिळाली होती. सेलिनाने पीटर हागबरोबर लग्न केले आहे.

पीटर आणि सेलिना यांना ३ आपत्य देखील आहेत. ट्विटरवर सेलिनाच्या चाहत्याने तिला लग्नसाठी मागणी घातली आहे. चाहत्याच्या ट्वीटला सेलिनाने दिलेल्या रिप्लायने अनेक चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

ट्विटरवर ट्वीट शेअर करत एका चाहत्याने सेलिनाला लग्नसाठी मागणी घातली आहे. त्याने ट्वीटमध्ये सांगितले आहे की, सेलिया जेटली, माझी तब्येत ठिक नाहीये. माझी काळजी घ्यायला कोणी नाही. माझी तब्येत आणखी बिघडण्या अगोदरच माझ्याशी लग्न कर. मी घर जावई व्हायला तयार आहे.

चाहत्याच्या ट्वीटला रिप्लाय देत सलिनाने सांगितले आहे की, ‘माझ्या ३ मुलांना आणि माझ्या नवऱ्याला विचारुन मी तुम्हाला सांगणार.’ सेलिनाने दिलेल्या या गमंतीशीर रिप्लायने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. अनेक चाहत्यांनी ट्विटरवर सलिनाच्या या रिप्लायचे कौतुक केले आहे.

सेलिना जेटलीनं तिच्या चाहत्याला दिलेल्या रिप्लायचे अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. एका चाहत्यांनी ट्विटवर लिहिले आहे, प्राइसलेस रिस्पॉन्स.” तर दुसऱ्या युझरने लिहिलं, मस्त रिप्लाय दिला. सेलिना जेटलीने ऑगस्ट २०११ मध्ये पीटर हाग याच्याशी लग्न केले आहे. या जोडप्याला २ जुळी मुले आणि ५ वर्षांचा मुलगा आर्थर आहे.

TIME 100 पोलमध्ये बादशाहा शाहरुख अव्वल स्थानी

सेलिना जेटली आणि तिचे कुटुंब सध्या ऑस्ट्रेलियात राहतात. सेलिना ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. इन्स्टावर ती स्वतःचे आणि तिच्या कुटुंबाचे सतत फोटो शेअर करत असते. सेलिना जेटलीला इन्स्टाग्रामवर ३७२K फॉलोवर्स आहेत. सेलिनाच्या सोशल मीडियावर पोस्टवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.  सेलिनाने ‘जनशीन’, ‘नो एंट्री’, ‘अपना सपना मनी मनी’ आणि ‘गोलमाल रिटर्न्स’ अशा चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. पण सध्या सेलिनाने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube