TIME 100 पोलमध्ये बादशाहा शाहरुख अव्वल स्थानी

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 07T162032.749

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा मागील काही दिवसांपासून कायमच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने सर्वच रेकाॅर्ड तोडले आहे. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरातून तब्बल १०० कोटींचे बाॅक्स आॅफिसवर (Box office) कलेक्शन केले होते. पठाण चित्रपटाला फक्त भारतामधून नाहीतर विदेशामधून देखील मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे की, उगाच आपल्याला बाॅलिवूडचा किंग म्हटले जात नाही.

पठाण चित्रपटाच्या या तूफान कामगिरीनंतर त्याला लगेचच डंकी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. आता सध्या शाहरुख खान हा जवान चित्रपटाच्या शूटिंमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या अगोदरच शाहरुख खान याने २ चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पठाण चित्रपटाची वाट आतुरतेने बघत होते. शाहरुख खान याच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे.

शाहरुख खानने २०२३ चा टाइम १०० पोल जिंकला आहे आणि टाइम १०० च्या यादीत सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व बनला आहे. विशेष म्हणजे या यादीत शाहरुख खान याने अनेक दिग्गज कलाकारांना तसेच काही लोकांना मागे टाकले आहे. २०२३ टाइम १०० पोलकरिता तब्बल १२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी वोट केले आहे. यामध्ये शाहरुख खान पहिल्या स्थानावर कायम राहिला आहे.

देसी गर्लच्या हाती लागला आणखी एक हॉलीवूड चित्रपट, जॉन सीनाबरोबर करताना दिसणार अ‍ॅक्शन

विशेष बाब म्हणजे या यादीमध्ये सेरेना विल्यम्स, मार्क झुकेरबर्ग, मिशेल येओह यांचाही समावेश आहे. फुटबॉल स्टार लियोनेल मेसी पाचव्या क्रमांकावर आहे. शाहरुख खान याचे चाहते फक्त भारतामध्ये नाहीतर विदेशात देखील असल्याचे स्पष्ट झाले आहेत. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादात सापडला होता. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध केले जात होता.

मात्र यादरम्यान शाहरुख खान सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. शाहरुख खान याने काही खास पठाण चित्रपटाचे प्रमोशन देखील केले नव्हते. तरीदेखील चित्रपटाने धमाकेदार कामगिरी नक्कीच बाॅक्स आॅफिसवर केली आहे. पठाण चित्रपच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन झाले होते. २०१९ मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे चाहत्यांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेला होता.

Tags

follow us