देसी गर्लच्या हाती लागला आणखी एक हॉलीवूड चित्रपट, जॉन सीनाबरोबर करताना दिसणार अ‍ॅक्शन

देसी गर्लच्या हाती लागला आणखी एक हॉलीवूड चित्रपट, जॉन सीनाबरोबर करताना दिसणार अ‍ॅक्शन

Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (priyanka chopra) सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. ( social media) तिच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे सर्व चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. (hollywood) ती लवकरच स्पाय थ्रिलर वेब सीरिज ‘सिटाडेल’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहेत. (Entertainment) या सीरिजमध्ये तिचा डॅशिंग अंदाज चाहत्यांना बघायला मिळणार आहे. तर आता तिच्या वाट्याला आणखी एक मोठा हॉलीवूड चित्रपट आला आहे.

WWE सुपरस्टार जॉन सीनाने ट्विटरवर एक ट्वीट शेअर करुन ‘हेड्स ऑफ स्टेट’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या ट्वीटमध्ये त्याने सांगितले आहे की, अशी ड्रीम टीम तयार केल्याबद्दल अॅमेझॉन स्टुडिओचे आभार. मी इदरीस एल्बाबरोबर हेड्स ऑफ स्टेटवर काम करण्यास उत्सुक आहे आणि मी या प्रोजेक्टमध्ये जगप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राचे स्वागत करतो.’

यावर प्रियांकाने ट्वीटला रिप्लाय दिला आहे, एवढं छान स्वागत केल्याबद्दल मी जॉन सीनाचे आभार मानते. मी या चित्रपटाच्या सेटवर येण्यास उत्सुक आहे. प्रियांकाची सिटाडेल ही सीरिज २८ एप्रिल रोजी चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘सिटाडेल’ ही सीरिज जगभरात २४० पेक्षा जास्त देशांमध्ये स्ट्रीम केली जाणार आहे. ‘सिटाडेल’ या वेब सीरिजची निर्मिती २३६ मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

Sidhu Moose Wala : सिद्धू मूसेवालांचे ‘मेरा ना’ गाणं चाहत्यांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले मिलिअन व्ह्यूज!

ही सीरिज भारतातील लोक हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये बघू शकणार आहेत. प्रियांकाच्या या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात. प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर हे करणार आहे. तसेच कतरिना कॅफ आणि आलिया भट या अभिनेत्री या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube