Download App

Arbaaz Khan Wedding: अरबाज खान पुन्हा चढला बोहल्यावर; 56व्या वर्षी बांधली लग्नगाठ!

Arbaaz khan sshura khan Wedding First Photo: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz khan) त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. याआधी तो त्याची एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीला डेट केल्यामुळे चर्चेत होता. लग्नाच्या बातम्यांदरम्यान त्याचा ब्रेकअप झाला आणि त्यानंतर अभिनेता मेकअप आर्टिस्ट शौरा खानसोबत (Shura Khan) 15 वर्षे जोडला गेला. दोघेही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत होते. दरम्यान, आता अरबाज खानने 24 डिसेंबर 2023 रोजी पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. लग्नानंतरचा त्याचा पहिला फोटोही समोर आला आहे, यामध्ये अभिनेता त्याचा मुलगा अरहान खान आणि नवविवाहित वधू शौरा खानसोबत एकाच फ्रेममध्ये बघायला मिळाले.


अरबाज खानने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर लग्नानंतरचे फोटो शेअर त्याने त्यांच्या नात्याची आणि लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. फोटोंमध्ये कपल रोमँटिक दिसत आहे. त्याचवेळी, मुलगा अरहान खान आणि नवविवाहित वधू शौरा खानसोबतचा एक फ्रेम केलेला फोटो इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये हे जोडपे मॅचिंग ड्रेसमध्ये दिसत आहे आणि अरहान वडिलांच्या लग्नात काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. निकाहमध्ये अभिनेत्याने फुलांचा सूट आणि क्रीम रंगाची पँट परिधान केला होता. सोबतच त्याची वधू फ्लोरल प्रिंटेड लेहेंग्यात दिसू शकते.

अरबाज खान आणि शौरा खान यांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर त्यांची पहिली भेट खूप खास आहे. दोघेही ‘पटना शुक्ला’च्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. तिथून त्यांच्या मैत्रीला सुरूवात झाली. आता त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि या जोडप्याने या नात्याला नाव दिले. अरबाजने लग्नानंतर पत्नी शौर खानसोबतचा पहिला रोमँटिक फोटो शेअर करत लिहिले की, ‘आमच्या प्रियजनांच्या उपस्थितीत मी आणि माझ्या पत्नीने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. या विशेष प्रसंगी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे.

Mohammed Rafi Birth Anniversary : बैजू बावराचं गाणं अन् रफींच्या घशातून अक्षरशः रक्त येत होतं, वाचा किस्सा

निकाह सोहळ्यात ‘या’ स्टार्सनी लावली हजेरी

अरबाज खान आणि शौराचा निकाह सोहळा त्यांची बहीण अर्पिता खानच्या घरी पार पडला. यामध्ये केवळ त्याचे कुटुंबीयच नाही तर इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सही सहभागी झाले होते. यामध्ये अरबाजचा मुलगा अरहान खान, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूजा, रवीना टंडन, फराह खान, साजिद खान आणि इतर बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली.

Tags

follow us