अभिनेता इमरान हाश्मी दिसणार ‘या’ नव्या वेब सीरिजमध्ये

  • Written By: Published:
अभिनेता इमरान हाश्मी दिसणार ‘या’ नव्या वेब सीरिजमध्ये

Emraan Hashmi News Webseries : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने (Emraan Hashmi)आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं. इमरानची तरुणाईमध्ये विशेष क्रेझ आहे. किसिंग सीनसाठी ओळखल्या जाणाऱ्या इमरानने अलीकडेच बॉलिवडूचा भाईजान सलमान खानच्या टायगर ३ मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. दरम्यान, आता इमरान नव्या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.

Government Schemes : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? 

नुकताच डिस्ने+ हॉटस्टार आणि धर्माटिक एंटरटेनमेंटच्या नवीन वेब शोचा पहिला ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यात बॉलीवूडमधील अनेक चेहरे दिसणार आहेत. प्रेक्षकांना खिळवूट ठेवणारी भन्नाट कथा, दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेल्या इट्स शो टाईममध्ये बॉलिवुडचा इमरान हाश्मीही झळकणार आहे. ट्रेलरमधल्या प्रत्येक फ्रेमला एक जादू देणारा त्याचा स्क्रीन प्रेझेन्स हा इमरान हाश्मीची वेगळी बाजू दाखवत आहे. इमरान हाश्मी एका प्रभावशाली चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय.

अरबाज खान पुन्हा चढणार बोहल्यावर! मेकअप आर्टिस्टसोबत बांधणार लग्न गाठ 

नेटफ्लिक्सवरील बार्ड ऑफ ब्लडच्या यशानंतर आता इमरान इट्स शोटाइम मध्ये दिसणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्याच OTT वर पदार्पण होणार आहे. इमरान हाश्मीचा OTT वर हा दुसरा परफॉर्मन्स असणार आहे.

या वेब शो मध्ये इमरान हाश्मीच पात्र हे वेगळं ठरणार असून नक्कीच तो खास दिसणार आहे. सुमित रॉय, शोरनर मिहिर देसाई यांनी तयार केलेल्या मिहिर देसाई आणि अर्चित कुमार दिग्दर्शित शोमध्ये इमरान हाश्मी, महिमा मकवाना, मौनी रॉय, नसीरुद्दीन शाह, राजीव खंडेलवाल आणि श्रिया सरन आहेत दिसणार आहेत.

इम्रान हाश्मीने आतापर्यंत, मर्डर, मर्डर 2, राझ 3, गँगस्टर, झहर, द डर्टी पिक्चर, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, आशिक बनाया आपने यासारख्या चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube