Emraan Hashmi: इमरान हाश्मी ठरला सिक्वेल हीरो; ‘टायगर 3’ ते ‘जन्नत 3’ अन् आवारापन 2

Emraan Hashmi: इमरान हाश्मी ठरला सिक्वेल हीरो; ‘टायगर 3’ ते ‘जन्नत 3’ अन् आवारापन 2

Emraan Hashmi: अभिनेता इमरान हाश्मीनं (Emraan Hashmi) आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये (Bollywood) अनोखं स्थान निर्माण केलं आहे. ओजी इमरान हाश्मी हा त्याच्या आकर्षक अभिनयासाठी कायम ओळखला जातो. अभिनयाची चुणूक आणि उत्तम कामगिरीसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता सध्या सिक्वेल हिरो ठरला आहे. एका यशस्वी सिक्वेलमधून दुसऱ्याकडे भागाकडे जाताना त्याचा अभिनय भाव खाऊन जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)


इमरान हाश्मीनं (Emraan Hashmi) मर्डर 2, (Murder 2) जन्नत 2, राझ 2 आणि राज 3 च्या सिनेमॅटिक अनुभवांनंतर इमरानने आता अलीकडे रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर ‘टायगर 3’मध्ये (Tiger 3 Movie) आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे.

टायगर 3 च्या दमदार यशाने इमरान सिक्वेलचा सुपरहिरो बनला आहे. त्याने आजवर अनेक हिट फ्रँचायझी केल्या आणि तो एक उत्तम अभिनेता आहे हे दाखवून दिलं आहे. ‘टायगर 3’ ची क्रेझ असताना इमरान बद्दलच्या अनेक चर्चा इंडस्ट्रीत होत आहेत. जन्नत3 आणि आवारापन2 आता येणार का ? आणि यात इमरान भूमिका साकारणार का? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. प्रेक्षक या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत.

कुणी 70 कोटी तर कुणी 4 लाख; ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन

‘टायगर 3’ च्या यशाचा आनंद लुटत असताना आणि ‘जन्नत 3’ आणि आवारापन 2 च्या चर्चा ना उधाण आलं आहे आणि इमरानने हे सिद्ध केले की, तो केवळ एक बॉलीवूड स्टार नाही तर यशस्वी सिनेमॅटिक अनुभव देणारा अभिनेता देखील आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube