Arbaaz Khan Marriage : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्री मलायका अरोरापासून घटस्फोट आणि जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अरबाज 24 डिसेंबर रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत (Shura Khan) लग्न करणार आहे. या लग्नाला अरबाजचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.
Manoj Jarange : नोटीस काढून सरकार-आंदोलकांमध्ये दरी पाडण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे भडकले
अरबाज खानने यापूर्वी मलायका अरोरासोबत लग्न केले होते. 1998 साली त्याचे मलायकासोबत लग्न झाले होते. पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. रिपोर्ट्सनुसार मलाइकाला अरबाजच्या काही सवयी आवडत नाहीत. त्यामुळं दोघांमधील अंतर इतके वाढले की, दोघांनी मार्च 2016 मध्ये विभक्त होण्याची घोषणा केली. आणि 19 वर्ष संसार केल्यानंतर त्यांनी 11 मे 2017 रोजी अधिकृतपणे घटस्फोट घेतला.
अरबाज आणि मलायकाचा घटस्पोट झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर या घटस्पोटामुळं अरबाजही एकटा पडला होता. त्यानतंर अरबाजने जॉर्जिया एंड्रियानीला डेट केले. तो तिच्याशी लग्न करणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. पण नंतर अरबाज आणि जॉर्जिया एंड्रियानीचे ब्रेकअप झाले.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची राज्यात एंट्री, आरोग्य प्रशासन सतर्क, मुंबईत मास्क सक्ती होणार?
अरबाजबद्दल दिलेल्या एका मुलाखतीत जॉर्जिया म्हणाली, ‘आम्ही खूप चांगले मित्र होतो. मला त्याच्याबद्दल नेहमीच भावना असतील. अरबाजचे मलायकासोबतचे नाते कधीच आमच्या अडसर ठरला नाही. मला आता कोणाची गर्लफ्रेंड व्हायचं नाही, असंही ती म्हणाली.
दरम्यान, आता अरबाज ज्या शुरा खानसोबत लग्न कऱणार आहे, ती व्यवसायाने एक मेकअप आर्टिस्ट आहे. नवीन चित्रपट पटना शुक्लाच्या सेटवर अरबाज आणि तिची भेट झाली होती. शौराने अनेक बड्या सेलिब्रिटींसोबत काम केलं. शौरा ही रवीना टंडन आणि तिची मुलगी राशाची मेकअप आर्टिस्ट देखील आहे. पण आता ती खान कुटुंबाची सून होणार आहे.
असे सांगितलं जातं की, दोघेही आपल्या नात्यांसाठी खूप संवेदनशील आणि सिरीयस आहेत. दोघेही घाईघाईत लग्न करत आहेत. त्यामुळं या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, मलायका आणि अरबाज खान यांना अरहान खान नावाचा मुलगा आहे. तो २१ असून मलायका आणि अरबाज हे दोघेही आपल्या लेकासोबत वेळ घालवतात.