Download App

Arijit Singh: छ. संभाजीनगरच्या लाईव्ह कार्यक्रमात चाहत्याने खेचला अरिजित सिंहचा हात, पाहा नेमकं काय घडलं…

Arijit Singh Injuired: प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंहचे (Arijit Singh) जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. ‘आशिकी-२’ सिनेमापासून अरिजित मोठा स्टार झाला आणि आता त्याचे अनेक गाणे (song) सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. (Video Viral) देश- विदेशात अनेक ठिकाणी अरिजितच्या लाईव्ह कॉन्सर्टचे (Live concert) आयोजन केले जातात.


सध्या अरिजितच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अरिजित सिंह लाइव्ह कॉन्सर्ट सुरू असतानाच एका चाहत्यांशी बोलत होता. यावेळी एका व्यक्तीने अरिजितबरोबर हात मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हात जोरात खेचला आहे. यामुळे अरिजितचा तोल जाऊन त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

या संबंधित व्यक्तीने असे वर्तन करून देखील अरिजित अतिशय संयमाने त्याच्याशी बोलत आहे, असे व्हायरल व्हिडीओत दिसून येत आहे. अरिजितचा हात खेचल्यावर तो संबंधित व्यक्तीला म्हणतो, ‘ऐक, तू मला खेचत आहेस, प्लीज स्टेजवर ये, मला खरंच खूप त्रास होत आहे. माझा हातही थरथरत आहे. तू इथे मजा करायला आला आहेस. काही हरकत नाही. पण जर मी परफॉर्म करू शकलो नाही, तर कोणीही या कॉन्सर्टचा आनंद घेऊ शकणार नाही.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

माझा हात खरोखरच इतका थरथरत आहे, मी पुढे कसं परफॉर्म करू? मी हा कॉन्सर्ट अर्धवट सोडून जाऊ का? तुम्ही कुठून लांबून जरी माझा कार्यक्रम बघण्यासाठी आला असाल तरी ही तुमची पद्धत चुकीची आहे. अरिजितचे म्हणणे ऐकून उपस्थित जमाव ‘कॉन्सर्ट अर्धवट सोडू नकोस, अशी विनंती त्याला करत असलयाचे देखील दिसून येत आहे.

Salman Khan धमकीप्रकरणी मोठी अपडेट; मेल प्रकरणी एका विद्यार्थ्याविरुद्ध लुकआउट नोटीस

या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटले आहे की, अरिजितने संयम न गमावता अतिशय शांतपणे हा संपूर्ण प्रसंग हाताळला आहे, तर दुसरा यूजरने एक कलाकार त्याच्या प्रत्येक चाहत्यासाठी चार तास नॉनस्टॉप परफॉर्म करत असतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. कृपया या कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि अशा ठिकाणी गेल्यावर वर्तणूक चांगली ठेवा. लाइव्ह कॉन्सर्टमधील हा प्रकार अतिशय निंदनीय आहे, असे त्याने यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us