Download App

Aryan Khan Case: नवऱ्यावर गंभीर आरोप होताच; क्रांती रेडकर मैदानात, म्हणाली….

Aryan Khan Case: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणात पोलीस अधिकारी समीर वानखेडे (Police Officer Sameer Wankhede) आता अडचणीत वाढ होत असलयाचे दिसून येत आहे. एनसीबी (NCB) मुंबई झोनचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने (CBI) एफआयआर नोंदवला आहे. आता त्यांच्या समर्थनार्थ वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिची प्रतिक्रिया समोर आली आहे.

या प्रकरणावरून पतीवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर पत्नी क्रांती रेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, हे सर्वांना माहीत आहे. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या कारवाईला पूर्ण सहकार्य करत आहोत. आमचा विश्वास आहे. कायदा आणि सुव्यवस्था आणि आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया क्रांती रेडकर यांनी दिली आहे.

हे आहेत आरोप

सीबीआयने FIR मध्ये समीर वानखेडे याच्यावर आर्यन खानला क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात न अडकवण्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. 12 मे 2023 रोजी CBI ने समीर वानखेडेच्या घरावर छापा टाकला, ज्याने आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात पकडले होते. एजन्सीच्या 10 ते 12 जणांच्या पथकाने सुमारे 13 तास वानखेडे यांच्या घरावर छापा टाकला आहे. सीबीआयने समीरच्या घरातून प्रिंटरसह अनेक कागदपत्रे काढून घेतल्याचे बोलले जात आहे.

Sameer Wankhede : 18 कोटींवर डील ठरली, 50 लाखांचं टोकन; सीबीआयचे वानखेडेंवर गंभीर आरोप

वानखेडेच्या 29 ठिकाणांवर छापे

एजन्सीने समीर वानखेडेच्या मुंबईतील घरासह दिल्ली, रांची आणि कानपूरमधील एकूण 29 ठिकाणी छापे टाकले आहेत. आर्यनला समीर वानखेडे याने क्रूझ प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्याला सुमारे 4 आठवडे न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. सुटका झाल्यानंतर, मे 2022 मध्ये, आर्यनला एनसीबीने क्लीन चिट दिली होती की त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत.

अशा परिस्थितीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करणं समीर वानखेडेसाठी चांगलंच भारी पडलं असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us