Download App

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफीचं अमित शाहांकडून प्रकाशन

Asha Bhosle Meet Amit Shah : महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृहावर करण्यात आला आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी आशाताईंच्या टिपलेल्या छायाचित्रांचे “व्हॅल्युएबल ग्रुप” आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या पुढाकाराने “बेस्ट ऑफ आशा” हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

आशा भोसले यांच्या विविध वेगवेगळ्या छायाचित्रातून त्यांचे जीवन आणि गाणे या पुस्तकातून उलघडण्यात आला आहे. काही फोटो आणि त्यांच्या त्या क्षणाचे काही आठवणी यांची अत्यंत देखण्या स्वरूपात मांडणी असलेला हा एक मौल्यवान दस्तऐवजच ठरावे अशी पुस्तकाची निर्मिती करण्यात आली.

आशा भोसले यांच्याबद्दल जाणून घ्या…: आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका म्हणजे आशा भोसले. ८ सप्टेंबर दिवशी आशा भोसले यांचा जन्म झाला. त्यांना संगीताचा वारसा त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळाला होता. आशा यांनी आजवर अनेक गाणी गायिली आहेत. 1943 साली त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. आशा या त्यांच्या कामासोबतच ते कायम खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत होत्या.

पुलकित-क्रितीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होताच, सोशल मीडियावर चर्चांना उधाण…

‘परदे में रहने दो’, ‘पिया तु अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘ये मेरा दिल’, ‘दिल चीज क्या है’ या आशा भोसले यांच्या गाण्यांना चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘जिवलगा राहिले रे दूर’, ‘ही वाट दूर जाते’, ‘फुलले रे क्षण माझे’,’ एका तळ्यात होती’ ही आशा भोसले यांची मराठी गाणी लोकप्रिय ठरली. आशाताईंनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनोखं स्थानं निर्माण केलं आहे. त्यांची सदाबहार गाणी चाहते आवडीनं ऐकतात. आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

follow us