आशीष चंचलानी हॉरर-कॉमेडी ‘एकाकी’चा पहिला गाणं ‘रम रम रम’ रिलीज

Ashish Chanchalani : भारताचे सर्वात मोठे डिजिटल स्टार्सपैकी एक असलेले आशीष चंचलानी आता एका नव्या क्रिएटिव्ह प्रवासात प्रवेश करत आहेत.

Ashish Chanchalani

Ashish Chanchalani

Ashish Chanchalani : भारताचे सर्वात मोठे डिजिटल स्टार्सपैकी एक असलेले आशीष चंचलानी आता एका नव्या क्रिएटिव्ह प्रवासात प्रवेश करत आहेत. ‘एकाकी’ मधून दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करताना ते प्रेक्षकांना पूर्णपणे वेगळा अनुभव देणार आहेत. ट्रेलरने आधीच इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

भारतभर पाच भाषांमध्ये रिलीज होणारी ‘एकाकी’ (Ekaki) आशीषच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. उत्सुकता वाढत असताना, निर्मात्यांनी पहिलं गाणं ‘रम रम रम’ रिलीज केलं आहे. शेवटी, ‘एकाकी’ ने आपल्या म्युझिकल जर्नीची सुरुवात केली असून टीझरनंतर आता संपूर्ण गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात आशीष बाकी कलाकारांसोबत दिसत आहेत आणि त्यांच्या काही मजेशीर डान्स स्टेप्समुळे हे गाणं आणखी मनोरंजक होतं.

गाणं अत्यंत ऊर्जादायी आहे आणि आशीषने (Ashish Chanchalani) खरोखर डान्स फ्लोअरवर आग लावली आहे. ‘रम रम रम’ गाण्यात आशीष चंचलानी दिसत आहेत. हे गाणं नक्श अज़ीज़ यांनी गायलं असून बॉस्को सीझर हे दिग्दर्शक आहेत. ‘एकाकी’ ही एक रर-कॉमेडी थ्रिलर मालिका आहे, जी सस्पेन्स, भय आणि विनोद यांना एकत्र आणते. हा स्टाइल आशीषच्या टाइमिंग आणि त्यांच्या टेन्शन–कॉमेडीच्या अंदाजाशी उत्तम जुळतो.

आपल्या जलद कथाकथनासाठी आणि विनोदी कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेले आशीष आता त्यांचं सर्वात मोठं प्रोजेक्ट घेत आहेत ‘एकाकी’ मध्ये ते रायटर, डायरेक्टर, प्रोड्यूसर आणि अ‍ॅक्टर अशी चारही प्रमुख भूमिका निभावत आहेत. ‘एकाकी’ मध्ये आशीष चंचलानी आपल्या जुन्या टीमसोबत दिसणार आहेत.

कुणाल छाबडिया सह-निर्माते आहेत, आकाश दोदेचा प्रमुख भूमिकांपैकी एक आहे, जशन सिरवानी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहेत आणि तनिष सिरवानी क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत.

Anmol Bishnoi : NIA ची मोठी कारवाई, अनमोल बिश्नोईला अटक; अमेरिकेतून भारतात आणले

ग्रीशिम नवानी यांनी सहलेखन केलं आहे आणि रितेश साधवानी यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे. ‘एकाकी’ प्रेक्षकांना एक नवीन आणि रोमांचक अनुभव देणार आहे. ही मालिका 27 नोव्हेंबर 2025 रोजी ACV Studiosच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज होईल.

Exit mobile version