एस.एस. राजामौली यांच्याकडून ‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानींचे भरभरून कौतुक
देशातील दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी आशिष यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
S. S. Rajamouli praises Ashish Chanchlani : आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, त्यांनी आपल्या करिअरमध्ये एक मोठे पाऊल उचलले आहे. अनेक वर्षे पॅरोडी आणि कॉमिक व्हिडिओद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन(Entertainment) केल्यानंतर, आता त्यांनी दिग्दर्शनाच्या(Direction) दुनियेत आपल्या पहिल्या वेबसीरिज ‘एकाकी’सह(Ekaki Web Series) पदार्पण केले आहे. हॉरर-कॉमेडी थ्रिलरवर आधारित या सीरिजचे पहिले दोन भाग प्रदर्शित झाले असून, प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हा क्षण आणखी खास ठरला आहे, त्यामागचं कारण म्हणजे देशातील दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली(S. S. Rajamauli) यांनीही आशिष यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी X या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत आशिष यांच्या कामाची प्रशंसा केली. आशिषसाठी ही दाद त्यांच्या सर्जनशील प्रवासातील एक मोठा अभिमानाचा क्षण आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
एस.एस. राजामौली यांनी एकाकीमधील काही स्टिल्स शेअर करत लिहिले, “वाराणसीतील एका इव्हेंटमध्ये आशिषची भेट झाली होती आणि आता त्यांना स्वतः लिहिलेली, दिग्दर्शित आणि निर्मित केलेली सीरिज घेऊन पुढे येताना पाहून खूप आनंद होत आहे. 👏🏻👏🏻 #Ekaki खूपच छान दिसत आहे… विशेषतः हॉररमधून साय-फायमध्ये जाणारा ट्विस्ट. अतिशय हुशार कल्पना. खूप खूप शुभेच्छा @ashchanchlani !!”
Met Ashish during the Varanasi event and now Iam happy to see him with his own fully written, produced, and self-made series. 👏🏻👏🏻#Ekaki looks promising… Especially the genre shift from horror to sci-fi. A clever twist. All the best @ashchanchlani !! pic.twitter.com/csRTlMAtCD
— rajamouli ss (@ssrajamouli) December 12, 2025
एकाकीमध्ये आशिष चंचलानी लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि मुख्य अभिनेता अशा अनेक जबाबदाऱ्या निभावताना दिसतात. यावरून त्यांच्या सर्जनशील आवडीची आणि मेहनतीची खोली स्पष्टपणे दिसून येते. या सीरिजसाठी त्यांनी आपल्या विश्वासू टीमला पुन्हा एकत्र आणले आहे. कुणाल छाबडिया को-प्रोड्यूसर म्हणून जोडले गेले आहेत, आकाश दोडेजा पॅरलल लीड भूमिकेत आहेत, तर जशन सिरवानी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून प्रोजेक्ट सांभाळत आहेत आणि तनीष सिरवानी क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सीरिजची संकल्पना आणि लूक तयार करत आहेत.
या सीरिजचे पटकथालेखन ग्रिशिम नवानी यांनी सहलेखनात केले आहे, तर लाइन प्रोड्यूसर रितेश सदवानी यांनी प्रोडक्शनमध्ये संपूर्ण सहकार्य दिले आहे. वेगळ्या धाटणीची आणि प्रेक्षकांना पूर्णपणे गुंतवून ठेवणारी कथा देण्याचे आश्वासन देणारी ही सीरिज ‘एकाकी’ चा पहिला भाग 27 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला होता आणि दुसरा भाग 8 डिसेंबर 2025 रोजी रिलीज झाला. हे दोन्ही भाग ACV स्टुडिओजच्या यूट्यूब चॅनेलवर एक्सक्लुझिव्ह स्वरूपात प्रदर्शित करण्यात आले आहेत.
