Download App

‘देखणा नट अन् माझा चांगला मित्र…; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक मामा झाले भावुक

Ravindra Mahajani Death: ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं निधन झालं आहे. ते शुक्रवारी पुण्यातील तळेगाव दाभाडे या गावात घरी मृतावस्थेत सापडले आहे. (Ravindra Mahajani Passed Away) फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना (Pune Police) याबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आले आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, घरातच आढळला मृतदेह

ते गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथे भाड्याने राहत होते, अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्या निधनावर ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ (Actor Ashok Saraf) म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके मामा यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. मराठी सिनेमासृष्टीने एक देखणा नट गमावला आहे, तसेच माझा चांगला मित्र देखील मी गमावला असल्याचे अशोक सराफ यांनी यावेळी सांगितले आहे.

“खूप वाईट घडलंय. आमच्या पिढीतला एकमेव देखणा नट गेला, असं मला वाटतं. तो हिरो आणि मी साईडला असे बरेच सिनेमे आम्ही दोघेजण एकत्र केले आहेत. आम्ही यशस्वी सिनेमा केले आहेत. एक चांगला माणूस, एक चांगला मित्र गेल्याने खूप दुःख होत आहे. एक चांगला नट आणि मित्र गमावल्याचे  दुःख मनात कायम राहणार आहे. नेहमी हसत खेळत वावरणारा, हसमुख चेहऱ्याचा नट होता. प्रामाणिकपणा हा त्याच्यातला सर्वात मोठा गुण असल्याचे यावेळी मामांनी सांगितले आहे.

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी

तो प्रत्येक भूमिका उत्तम प्रकारे रंगवत असायचा. जे करायचा ते मन लावून करत असायचा. त्यामुळे तो त्या काळातला एक यशस्वी हिरो होता,” अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी यावेळी दिली आहे. तसेच रवींद्र महाजनी हे मराठी सिनेमासृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या निधनाने मराठी सिनेमासृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. रवींद्र यांनी ‘मुंबईचा फौजदार’, ‘झूंज’ आणि ‘कळत नकळत’ यांसारख्या सिनेमामध्ये काम केले होते. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी हा देखील अभिनेता आहे.

Tags

follow us