Download App

कलाकारांनो सज्ज व्हा! 22 वा Third Eye आशियाई चित्रपट महोत्सव, प्रवेशिका सुरू

22nd Third Eye Asian Film Festival : कलाकारांसाठी महत्वाची बातमी आहे. एशियन फिल्म फाऊंडेशन (Asian Film Foundation) या संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा 22 वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव ( 22nd Third Eye Asian Film Festival) दिनांक 9 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे होणार आहे. या महोत्सावाच्या प्रवेशिका सुरू (Entertainment News) झाल्या आहेत.

यंदाच्या चित्रपट महोत्सवात पुढील स्पर्धा प्रकारांसाठी प्रवेशिका पाठवता येतील

1. स्पर्धात्मक विभाग:

अ. भारतीय चित्रपट स्पर्धा
आ. समकालीन मराठी चित्रपट स्पर्धा

2. अस्पर्धात्मक विभाग:

आशियाई चित्रपट स्पर्धा

चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते त्यांनी तयार केलेले चित्रपट Film freeway द्वारे www.thirdeyeasianfilmfestival.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर चित्रपट प्रवेशिका पाठवू शकतात.

सपकाळांचा ‘नवा खेळ’ चर्चेत! नाना पटोलेंच्या जवळच्या लोकांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून डच्चू

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख आणि संबंधित नियमावली महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आशियाई चित्रपट फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांनी आशिया खंडातील चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांना यावर्षीच्या महोत्सवात सहभागी होण्याचे आणि त्यांनी तयार केलेले नाविन्यपूर्ण चित्रपटांच्या प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी, कृपया www.thirdeyeasianfilmfestival.com ला भेट द्या.

अमेरिकेने भारताला डिवचले! पाकिस्तानसोबत तेल कराराची हातमिळवणी, ट्रम्प सरकारचा दुटप्पी निर्णय?

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भारतीय आणि आशियाई सिनेमा सादर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करण्याची ही मोठी संधी आहे. विश्वस्तरीय अनुभवांची देवाणघेवाण, नामांकित चित्रपटांची स्क्रीनिंग, तसेच विविध पुरस्कारांची लढती यासाठी या महोत्सवात सहभागी होणं कलाकारांसाठी महत्वाचं ठरणार आहे.

 

follow us