ASK SRK : ‘डंकी’च्या रिलीजपूर्वीच शाहरुख खानची मोठी घोषणा! हाऊसफूल…

Shah Rukh Khan ASK SRK : बॉलिवूडचा (Bollywood)बादशाह शाहरुख खान(Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki)चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यातच शाहरुखनं त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. ट्विटरवर शाहरुखने आस्क एसआरके असं एक सेशन ठेवलं. त्यामध्ये शाहरुखने त्याच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मजेशीरपणे उत्तरं दिली आहेत. त्याचवेळी शाहरुखने आपल्या आगामी ‘डंकी’चित्रपटाबद्दल मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी शाहरुख […]

Shahrukh Dunki Film

Shahrukh Dunki Film

Shah Rukh Khan ASK SRK : बॉलिवूडचा (Bollywood)बादशाह शाहरुख खान(Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki)चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यातच शाहरुखनं त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. ट्विटरवर शाहरुखने आस्क एसआरके असं एक सेशन ठेवलं. त्यामध्ये शाहरुखने त्याच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मजेशीरपणे उत्तरं दिली आहेत. त्याचवेळी शाहरुखने आपल्या आगामी ‘डंकी’चित्रपटाबद्दल मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी शाहरुख नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊया…

अजित पवारांनी शब्द पाळला नाही, 1 जानेवारीनंतर जाब विचारणार; विजयस्तंभ समितीचा इशारा

शाहरुख खानने आस्क एसआरके सत्र सुरु करताच एका चाहत्याने शाहरुखला विचारले की, मी ‘डिंकी’ चित्रपटासाठी फ्रंटसीट बुक करू की कॉर्नरवाली…? त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुखने उत्तर देताना सर्वांची मनं जिंकली. शाहरुख म्हणाला की, ‘भाऊ, मला विश्वास आहे की चित्रपट हाऊसफूल होणार आहे… तुम्हाला जागा तर मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही घरून सोफा आणावा, शाहरुखचं हे उत्तर आता चाहत्यांना आवडू लागलं आहे.


या सत्रात शाहरुखने सांगितलं की, तो ‘डंकी’ आणि त्याची मुलगी सुहाना खानच्या ‘द आर्चिज’ चित्रपटाबद्दल अधिक उत्सुक आहे. त्याचवेळी एका चाहत्याने त्याला विचारले की, तुम्ही कोणत्या चित्रपटासाठी जास्त उत्सुक आहात, ‘डंकी’ की ‘आर्चीज’?… तेव्हा शाहरुखने सांगितले की, सुहानाला ‘डंकी’ आवडते आणि मला ‘आर्चीज’ आवडतात.


याशिवाय एका चाहत्याने शाहरुखला विचारले की, थिएटरमध्ये तिकीटाशिवाय जाण्याचा मार्ग आहे का? त्याला उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, मी लहान होतो तेव्हा मी थिएटरमधील एका प्रोजेक्शनिस्टला चित्रपट बघायला पटवायचो. तुम्ही पण तसं करुन बघा, कदाचित ही आयडीया चालेल. पण हे मी तुम्हाला सांगितल्याचे कोणाला सांगू नका..हे आमचे रहस्य आहे, असेही शाहरुख म्हणाला.


याशिवाय एका चाहत्याने शाहरुखला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारला. त्या चाहत्याने विचारले की, शाहरुख कोणत्या वेळी सर्वात जास्त काळजीत होता? आणि अस्वस्थतेचा सामना कसा केला? यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, मी शांत राहून या गोष्टींना सामोरे जातो. मी थोडं लिहितो आणि मुलांसोबत वेळ घालवतो असेही यावेळी शाहरुखने सांगितले.

Exit mobile version