Bombay Times Fashion Week मध्ये जालनाई सिल्क साड्यांच्या स्टाॅलने वेधले फॅशन डिझायनर्सचे लक्ष!

Bombay Times Fashion Week : मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'बाॅम्बे टाईम्स फॅशन वीक' मध्ये जालनाई सिल्क साड्यांच्या स्टाॅलने देशभरातील

Bombay Times Fashion Week

Bombay Times Fashion Week

Bombay Times Fashion Week : मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘बाॅम्बे टाईम्स फॅशन वीक’ मध्ये जालनाई सिल्क साड्यांच्या स्टाॅलने देशभरातील  फॅशन डिझायनर्स आणि खरेदीदारांचे लक्ष वेधून घेतले. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील तुती उत्पादक शेतकरी व हातमाग कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी फॅशन वीक मध्ये हा साड्यांचा स्टाॅल लावण्यात आला होता. मुंबईतील ग्रँड हयात येथे प्रतिष्ठित ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’चे शानदार आयोजन आज करण्यात आले होते.  या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांच्यासह देशभरातील नामवंत फॅशन डिझायनर्स, व्यावसायिक आणि उद्योजकांनी सहभाग घेतला होता. विविध प्रकारच्या आधुनिक कपड्यांचे आणि फॅशन उत्पादनांचे भव्य प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले आहे.

‘जालनाई सिल्क’ने वेधले विशेष लक्ष

या जागतिक स्तरावरील फॅशन मांदियाळीत, जालना जिल्ह्याच्या ‘जालनाई सिल्क’ (Jalnai Silk) साड्यांच्या विशेष स्टॉलने सर्व फॅशन डिझायनर्स आणि खरेदीदारांचे लक्ष वेधून घेतले होते. अस्सल पारंपरिक हातमाग आणि आधुनिक डिझाईनचा सुरेख संगम या साड्यांमध्ये पाहायला मिळत असल्याने प्रदर्शनात या ब्रँडची विशेष चर्चा झाली.

काय आहे जालना सिल्कचे वैशिष्ट्य?

‘जालनाई सिल्क’ हा केवळ एक कापड ब्रँड नसून, ती तुती लागवडीपासून ते थेट रेशीम कापड निर्मितीपर्यंतची ‘माती ते रेशीम’ (Soil to Silk) अशी एक संपूर्ण आणि शाश्वत परिसंस्था आहे. जालन्याला ‘सिल्क, सीड आणि स्टील’ (Triple S City) हब म्हणून ओळखले जाते. याच स्थानिक परंपरेला अनुसरून साड्यांच्या डिझाईनमध्ये जालन्याची खास मोसंबी आणि स्टील उद्योगाचा वारसा गुंफण्यात आला असून, ‘कोष ते थेट फॅशनेबल कुट्युर’ (Cocoon to Couture) असा हा अनोखा रेशीम प्रवास आहे.

या प्रकल्पामुळे जालना जिल्ह्यातील स्थानिक तुती उत्पादक शेतकरी आणि हातमाग (Handloom) कारागिरांना मोठी चालना मिळत आहे. आतापर्यंत 235 हून अधिक शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले असून, खरपुडी येथील केंद्रात ३० महिलांना हातमागावर साड्या विणण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण आणि स्थानिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. जालन्यातील रेशीम उद्योगाची ही वाटचाल अत्यंत प्रेरणादायी आहे. शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणापासून आणि कोष उत्पादनापासून सुरू झालेला हा प्रवास, खरपुडी येथील प्रशिक्षण केंद्रात अपडेटेड जॅकवार्ड (Jacquard) मशिन्सवर साड्या विणण्यापर्यंत पोहोचला. आज हेच स्थानिक ‘जालनाई सिल्क’ थेट ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’सारख्या देशातील अत्यंत प्रतिष्ठित व्यावसायिक मंचावर दिमाखात पोहोचले आहे.

दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन ; वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास-

 पंकजा मुंडेंचा पुढाकार

जालनाई सिल्कचा हा यशस्वी प्रवास आणि जागतिक भरारी राज्य शासनाच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री व मंत्री पंकजा मुंडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व दूरदृष्टीतून या प्रकल्पाला आणि जालन्यातील रेशीम कोष बाजारपेठेला गती मिळाली आहे. शासन व त्यांच्या या पुढाकारामुळेच जालन्याचे रेशीम आज जागतिक व्यासपीठावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे.

Exit mobile version