Download App

बर्लिनमध्ये मराठी सिनेमासाठी टाळ्यांचा कडकडाट, लेखिकेने शेअर केला अनुभव

मुंबई : दिग्दर्शक परेश मोकाशी (Paresh Mokashi) यांचा ‘आत्मपॅम्फ्लेट’ (Atmapamphalet) सिनेमाचं बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग झालं. त्यावेळी आलेला अनुभव मधुगंधा कुलकर्णी (Madhugandha Kulkarni) यांनी शेयर केलाय. त्यांनी लिहिलंय कि.. ‘बर्लिनमध्ये अमराठी लोकांनी Atmapamphalet इतकी एन्जॉय केली की सिनेमा संपल्यानंतरही खूप काळ टाळ्यांचा गजर चालूच होता!’

‘आपली मराठी माणसं, आपला देश ह्याचं कौतुक मोलाचं आहेच पण ज्यांना भाषा कळतच नाही त्यांची दाद म्हणजे सिनेमा भाषेच्या पलीकडे जावून भावला असल्याचा संकेत आहे.’ असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी लिखित वाळवी सिनेमा सुपरहिट झाला. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी या नवरा – बायकोच्या जोडीने त्यांच्या करियरमध्ये अजून एक चांगला सिनेमा दिलाय.

CWC निवडणूक होणार नाही, खर्गे यांना सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार

परेश मोकाशी लिखित आत्मपॅम्फ्लेट सिनेमाचं पोस्टर आऊट झालंय. या पोस्टरमध्ये एका तरुण मुलाने त्याच्या तोंडावर फेस लावला असून तो त्याचं तोंड कापण्याच्या तयारीत आहे. परेश मोकाशी यांनी हा सिनेमा लिहिला आहे.

‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाची ‘जनरेशन १४ प्लस’ स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याचा प्रीमियर ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. त्यानिमित्ताने मधुगंधा कुलकर्णी परेश मोकाशी सोबत बर्लिन फिल्म फेस्टिवलला गेल्या होत्या.

‘आत्मपॅम्फ्लेट’ चा बर्लिन फिल्म फेस्टिवल मधील प्रीमियर शो हाऊसफुल्ल झाला होता. २२ फेब्रुवारीला सिनेमाचं स्क्रीनिंग करण्यात आलंय. परेश मोकाशी यांनी या सिनेमाच्या लेखनाची जबाबदारी घेतली असून आशिष बेंडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

Tags

follow us