CWC निवडणूक होणार नाही, खर्गे यांना सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार
रायपूर : रायपूरमध्ये काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी देशभरातील काँग्रेस नेते पोहोचले आहेत. या अधिवेशनाला राहुल गांधी आणि सोनिया गांधीही उपस्थित होते. सुकाणू समितीच्या बैठकीत CWC निवडणुका होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सदस्य नामनिर्देशित करण्याचे अधिकार सर्वानुमते देण्यात आले आहेत.
विषय समितीच्या बैठकीत राजकीय, आर्थिक व परराष्ट्र व्यवहार, कृषी, युवा शिक्षण, रोजगार, समाजकल्याण, सक्षमीकरण या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावर राजकीय ठरावही होऊ शकतो.
शुक्रवारी सकाळपासून अनिश्चिततेचे वृत्त आल्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी दुपारी तीनच्या सुमारास विशेष विमानाने रायपूरला पोहोचले. विमानतळावर मुख्यमंत्री भूपेश बघेल, विधानसभा अध्यक्ष डॉ. चरणदास महंत, एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मोहन मरकाम आणि अन्य नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
विमानतळाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. छत्तीसगढ़ी शैलीत स्वागत करण्यासाठी अनेक नृत्य पथकांना येथे बोलावण्यात आले होते. सोनिया आणि राहुल येथे पोहोचताच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. येथून ते खासगी रिसॉर्टकडे रवाना झाले. यानंतर ते संमेलनाच्या ठिकाणी जातील.
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’करण्यास केंद्राची मंजुरी
सोनिया उद्या तर राहुल 26 तारखेला संबोधित करणार
आता मिळालेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता सोनिया गांधी या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. तर राहुल गांधी 26 फेब्रुवारीला पहिल्या सत्रात अधिवेशनाला संबोधित करणार आहेत.