औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’करण्यास केंद्राची मंजुरी

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’करण्यास केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली : औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ (Chhatrapati Sambhajinagar) उस्मानाबादचे ‘धाराशिव’ (Dharashiva) असे नामांतर करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता. यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी या दोन्ही शहराच्या नामांतराची घोषणा केली होती. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या निर्णयाला स्थिगिती दिली आणि संभाजीनगरच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करून केंद्रकडे प्रस्ताव पाठवला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येणार व्हर्च्युअल चित्रपट, क्राउड फंडिंगच्या माध्यमातून निर्मिती  

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले की, केंद्र सरकारने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा आभारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावाने मागील काही वर्षांपासून राजकारण सुरू होते. हिंदुत्ववादी संघटनांकडून नामांतराची मागणी केली जात होती. आज याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता यापुढे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube