अवतार 2 ठरला भारतात सर्वाधिक कमाई हॉलिवूड चित्रपट

मुंबई : जेम्स कॅमेरॉन यांचा अवतार – द वे ऑफ वॉटर भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. हे रेकॉर्ड करताना या चित्रपटाने 454 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे जेम्स कॅमेरॉन यांचा अवतार – द वे ऑफ वॉटर भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. या अगोदर अ‍ॅव्हेंजर एन्डगेम या हॉलिवूड चित्रपटाने भारतात […]

Untitled Design (36)

Untitled Design (36)

मुंबई : जेम्स कॅमेरॉन यांचा अवतार – द वे ऑफ वॉटर भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. हे रेकॉर्ड करताना या चित्रपटाने 454 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे जेम्स कॅमेरॉन यांचा अवतार – द वे ऑफ वॉटर भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

या अगोदर अ‍ॅव्हेंजर एन्डगेम या हॉलिवूड चित्रपटाने भारतात 438 कोटींची कमाई केली होता. तर आता जेम्स कॅमेरॉन यांच्या अवतार – द वे ऑफ वॉटरने भारतात 454 कोटींची कमाई करत अ‍ॅव्हेंजर एन्डगेमचे रेकॉर्ड तोडत अवतार – द वे ऑफ वॉटर भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

भारतात जेम्स कॅमेरॉन यांचा अवतार – द वे ऑफ वॉटर इंग्लिशसह हिंन्दी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्यालम या भाषांमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 45 कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.

‘अवतार द वे ऑफ वॉटर’ने रिलीज झाल्यापासून खळबळ माजवली आहे. या चित्रपटाने अवघ्या 2 आठवड्यात जगभरात 7000 कोटींहून जास्त कमाई केली आहे. जेम्स कॅमेरूनचा हा चित्रपट जगभरातील लोकांना आवडला आहे. ‘अवतार’ प्रमाणेच ‘अवतार 2’ देखील कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर झेंडा रोवत आहे.

Exit mobile version