Awarapan 2 : ‘आवारापन 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला असून 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सुरुवातीच्या चित्रपटांच्या यादीत त्याने तिसरे स्थान पटकावले आहे. इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने भारतात 10.06 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद इम्रान हाश्मीच्या ‘शिवम पंडित’ या अत्यंत लोकप्रिय व्यक्तिरेखेच्या दमदार पुनरागमनाचे प्रतीक ठरला आहे. नितीन कक्कर दिग्दर्शित ‘आवारापन 2’ मध्ये दिशा पटानी, शबाना आझमी, पूरन गब्बी, सुविंदर विकी, अनिरुद्ध रावल आणि इतर कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटातील उत्कृष्ट संगीतालाही प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली असून, ते संगीत चार्ट्सवरही आघाडीवर आहे.
रुपेरी पडद्यावरच्या यशानंतर ‘घबाडकुंड’ आता अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर!-
मुकेश भट्ट आणि विशेष फिल्म्सद्वारे सादर केलेला आणि विशेष भट्ट यांनी निर्मिती केलेला ‘आवारापन 2’ सध्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, ‘पेन मारुधर’द्वारे याचे संपूर्ण भारतातील वितरण केले जात आहे.
