‘Awarapan 2’ off to strong start at box office earns twenty three crore on the very first day : विशेष भट्ट यांच्या बहुप्रतीक्षित ‘आवारापन 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार एन्ट्री केली आहे. इमरान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी भारतात 23.4 कोटी रुपयांची नेट कमाई नोंदवली आहे. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, हाऊसफुल्ल शो आणि आगाऊ बुकिंगला मिळालेला चांगला प्रतिसाद यामुळे चित्रपटाची सुरुवात दमदार झाली आहे.
दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा; स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
जवळपास दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आवारापन’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यानंतर आता या कथेचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रोमँस, अॅक्शन, भावनिक प्रसंग आणि लोकप्रिय संगीत यांचा मेळ साधत ‘आवारापन 2’ मोठ्या पडद्यावर सादर करण्यात आला आहे. इमरान हाश्मी पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना परिचित असलेल्या भूमिकेच्या विश्वात परतला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीपासूनच त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. पहिल्या दिवसाच्या कमाईतूनही या उत्साहाची झलक पाहायला मिळाली.
‘आवारापन’च्या चाहत्यांसाठी पुन्हा सेलिब्रेशन
‘आवारापन 2’च्या प्रदर्शनासोबतच या चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्याच दिवशी 23.4 कोटींची भारतातील नेट कमाई करत चित्रपटाने आपल्या थिएटरमधील प्रवासाची सुरुवात दमदार पद्धतीने केली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत राहिल्यास चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील वाटचाल आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.
कलाकारांची दमदार टीम
नितीन कक्कर यांनी ‘आवारापन 2’चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा बिलाल सिद्दीकी आणि विशेष भट्ट यांनी लिहिली आहे. चित्रपटात इमरान हाश्मी, दिशा पटानी, शबाना आझमी, पुरन गब्बी, सुविंदर विकी आणि अनिरुद्ध रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुकेश भट्ट आणि विशेष फिल्म्स यांच्या सादरीकरणाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती विशेष भट्ट यांनी केली आहे. भारतातील थिएटर वितरणाची जबाबदारी पेन मरुधर यांच्याकडे असून, ‘आवारापन 2’ सध्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
