Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मंदिराचे उद्घाटन 24 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. त्यामध्ये अनेक बॉलिवूडचे कलाकार देखील हजेरी लावणार आहेत.
Share Bazar : शेअर बाजारात मोठी उसळी! एका दिवसात गुंतवणूकदार मालामाल…
अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir) जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारी रोजी हा सोहळा होणार आहे. यासाठी देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठविण्यात येत आहेत. यामध्ये राम मंदिर ट्रस्टकडून (Ram Mandir Trust ) पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण अनेक बॉलिवूडच्या कलाकारांना देण्यात आलं आहे. त्यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट, टायगर श्रॉफ, सनी देओल, अजय देवगण, आयुष्मान खुराना त्याचबरोबर दाक्षिणात्या सुपरस्टार प्रभास आणि यश यांचा देखील यामध्ये समावेश आहे.
कट्टर शत्रूंना धडकी भरविणारी INS Imphal भारतीय नौदलात, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्यासाठी सज्ज
दरम्यान, अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातून देणगीचा ओघ सुरुच आहे. विविध प्रांतांतून विविध वस्तू अयोध्येला येत आहेत. येथील तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. राम मंदिर ट्रस्टकडून विविध प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रणंही दिली जात आहेत. राज्यातील अनेक व्यक्ती, धार्मिक, सामाजिक संस्थांना अशी निमंत्रणं मिळाली आहेत.
यामध्ये जवळपास चार हजार साधू पुजारी आणि 2200 अन्य मान्यवर व्यक्तींना या सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलं आहे. देशातील प्रमुख मंदिरांच्या मुख्य पुजाऱ्यांना देखील निमंत्रित केलं आहे. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर 24 जानेवारी रोजी मंडलपूजा करण्यात येईल. तसेच 23 जानेवारीपासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे, अशी माहिती चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत दिली.