Dream Girl 2 Trailer: आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ चा दिलखेचक ट्रेलर चर्चेत

Dream Girl 2 Trailer: अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या त्याच्या ‘ड्रीम गर्ल २’ (Dream Girl 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्मात्यांनी या सिनेमाचे अनेक पोस्टर्स सोशल मीडियावर (social media) शेअर केले आहेत. आता नुकताच ‘ड्रीम गर्ल २’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘ड्रीम गर्ल २’ हा आयुष्मान खुरानाच्या २०१९ […]

Dream Girl 2 Trailer

Dream Girl 2 Trailer

Dream Girl 2 Trailer: अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या त्याच्या ‘ड्रीम गर्ल २’ (Dream Girl 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्मात्यांनी या सिनेमाचे अनेक पोस्टर्स सोशल मीडियावर (social media) शेअर केले आहेत. आता नुकताच ‘ड्रीम गर्ल २’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘ड्रीम गर्ल २’ हा आयुष्मान खुरानाच्या २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’चा सीक्वेल आहे. ‘ड्रीम गर्ल’ या सिनेमाचे संपूर्ण कथानक ‘पूजा’ या पात्रावर आधारलेले आहे. आयुष्मान सिनेमात स्त्रीवेश परिधान करून पूजाचे पात्र साकारताना दिसून येणार आहे. ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिसवर (box office) सुपरहिट ठरला होता. यामुळे आता चाहत्यांना ‘ड्रीम गर्ल २’ कडून देखील अपेक्षा आहेत.

‘ड्रीम गर्ल २’च्या ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना कर्जबाजारी झाल्याने परत एकदा पूजाचा स्त्रीवेश परिधान करून गाणी गाण्यास, फोनवर बोलण्यास सुरुवात करतो असे ट्रेलर दाखवण्यात आले आहे. त्याच्यासह अभिनेत्री अनन्या पांडे ही देखील मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहे. सिनेमाचे पोस्टर शेअर करत आयुष्मानने “ट्राफिक जॅम होणार कारण ४ वर्षांनी ड्रीम गर्ल पूजा येत आहे…” असे हटके कॅप्शन यावेळी दिले आहे.

Gashmir Mahajani: चाहत्याने रवींद्र महाजनींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर गश्मीर थेटच म्हणाला, “मी माझ्या…”

‘ड्रीम गर्ल २’ या सिनेमात आयुष्मान खुराना आणि अनन्याबरोबर परेश रावल, असरानी, राजपाल यादव, मनजोत सिंग आणि अनु कपूर यांसारखे हटके कलाकार देखील दिसणार आहेत. याअगोदर हा सिनेमा २५ जुलैला रिलीज होणार होता. परंतु काही कारणास्तव निर्मात्यांनी तारीख बदलून आता ‘ड्रीम गर्ल २’ २५ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Exit mobile version