Download App

Ayushmann Khurrana : वडिलांच्या निधनानंतर आयुष्मानची भावनिक पोस्ट, म्हणाला…

Ayushmann Khurrana : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुरानाचे (Ayushmann Khurrana) वडील एस्ट्रोलॉजर पी खुराना (P Khurrana) यांचे 19 मे रोजी निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून काही आजाराने त्रस्त झाले होते. वडिलांच्या निधनानंतर आयुष्मानने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर (Social media) शेअर केली आहे.


आयुष्मानची भावनिक पोस्ट

आयुष्माननं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आयुष्मानची आई, त्याचा भाऊ अपरशक्ती खुराना हे दिसून येत आहेत. या फोटोला त्यानं लिहिले आहे की, ‘आईची काळजी घेणार आणि नेहमी तिच्याबरोबर राहणार आहे. वडिलांसारखं होण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांपासून खूप दूर जावं लागणार आहे. वडील आपल्यापासून खूप दूर देखील आहेत आणि खूप जवळ देखील आहेत, असं पहिल्यांदा मला जाणवत आहे.

तुमचे संगोपन, प्रेम आणि सर्वात सुंदर आठवणींसाठी धन्यवाद.’ आयुष्मानच्या या पोस्टला अर्जुन कपूरने देखील कमेंट केली आहे, ‘त्यांचे व्यक्तीमत्व शांत होते. त्याच्याशी संवाद साधायला मला नेहमी आवडत होते.’ आयुष्मानचा भाऊ अपरशक्ती खुरानाने देखील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अपरशक्तीने बाबांचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे.

‘Raavrambha’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शक महेश टिळेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

तसेच अपरशक्तीने पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “खुल के हँसो, खुल के जियो, खुल के मेहनत करो।” असं माझ्या वडिलांनी मला सांगितले आहे. पी खुराना यांचा 18 मे रोजी वाढदिवस होता. परंतु प्रकृती खालावल्याने आयुष्मानला त्यांचा वाढदिवस साजरा करता आला नाही. अखेर 19 मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

पी खुराना ख्यातनाम ज्योतिषी आहेत, त्यांनी 34 पुस्तके लिहिली आहेत. आयुष्मानचा ड्रीम गर्ल-2 हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आयुष्मान हा त्याच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकत आहेत. आयुष्मानच्या आगामी सिनेमांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. एन अॅक्शन हिरो, डॉक्टर जी या आयुष्मानच्या सिनेमाला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती.

Tags

follow us