Download App

संगीताच्या माध्यमातून सर्जनशील अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न; आयुष्यमान खुरानाने मांडलं मत

संगीताच्या माध्यमातून सर्जनशील अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न, असल्याचं मत गायक आयुष्यमान खुरानाने आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त मांडलंयं.

Ayushmann Khurrana : संगीताच्या माध्यमातून मी नेहमीच माझ्या सर्जनशील अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला असल्याचं मत गायक आयुष्यमान खुरानाने (Ayushmann Khurrana) मांडलं. दरम्यान, आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या (World Music Day) निमित्ताने आयुष्यमान खुरानाने संगीत निर्मीती प्रक्रियेबद्दल आपले विचार मांडले आहेत.

मोठी बातमी! येस बँकेच्या कंपनीला मोठा झटका; बँक खाती गोठवण्याचे कोर्टाचे आदेश, काय आहे प्रकरण

पुढे बोलताना खुराना म्हणाला, माझ्या चित्रपटांसारखेच माझे संगीत देखील कोणत्याही दुसऱ्या फॉर्म्युलाचं अनुसरण करीत नाही. कलाकार म्हणून मी कोणत्याही चौकटीत राहू शकत नाही, मी तसं करु इच्छित नाही. मी नेहमीच संगीताच्या माध्यमातून सर्जनशील अभिव्यक्तीशीस प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला, लोकांनी मला स्विकारले भरभरुन प्रेम दिले,याचा मला आनंद आहे. जेव्हा मी संगीत करतो तेव्हा नेहमीच वेगळं असतं, प्रत्येकवेळी काहीतरी नवीन रोमांचक असतं, असं आयुष्यमान खुराना म्हणाले आहेत.

Video: सोनम वांगचुक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात, दिल्लीत काय घडलं?

तसेच संगीत नेहमीच माझ्या जीवनाच्या चढ-उतारांमध्ये माझा सोबती राहिला असून संगीताच्या जोरावरच मी प्रत्येक दिवस जगत असून माझं नवीन गाणं ‘जचदी’ हे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळं करण्याचं उत्तम उदाहरण आहे, मी माझ्या संगीत आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत राहणार आहे, ढोल बीट्स सह पंजाबी पॉपच्या ऊर्जावान बीट्स सणाच्या उत्साहाला उत्तम प्रकारे प्रदर्शित करतात आणि मला विश्वास आहे की, लोकं यावर नवरात्रीत नक्कीच थिरकतील, असंही खुराना म्हणाला आहे.

सरकार तिन्ही गॅझेट लागू करणार का?, शिंदे समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर जरांगेंचा सवाल

दरम्यान, चित्रपट आणि संगीतासाठी मिळालेलं प्रेम याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि माझ्या सर्जनशील प्रयत्नांना सतत पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानत असल्याचंही खुराना म्हणाला आहे. खुरानाची बॉलिवूड सुपरस्टार आणि गायक म्हणून ओळख आहे.

follow us