Baipan Bhaari Deva: केदार शिंदेंची बायको अन् लेकीसाठी भावुक पोस्ट! म्हणाले, “रात्री डोळ्यात पाणी…”

Kedar Shinde: ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सिनेमाला चाहत्यांनी भरपुर प्रेमदिल आहे. बाईपण भारी देवा या सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी (Director Kedar Shinde) यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये केदार शिंदेंनी बायको (wife) आणि लेकीचे (Daughter) आभार मानले आहे. जेव्हा बाईपण भारी देवा सिनेमासाठी कोणी निर्माता […]

Baipan Bhaari Deva Kedar Shinde

Baipan Bhaari Deva Kedar Shinde

Kedar Shinde: ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सिनेमाला चाहत्यांनी भरपुर प्रेमदिल आहे. बाईपण भारी देवा या सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी (Director Kedar Shinde) यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये केदार शिंदेंनी बायको (wife) आणि लेकीचे (Daughter) आभार मानले आहे. जेव्हा बाईपण भारी देवा सिनेमासाठी कोणी निर्माता मिळत नव्हता. त्यावेळेस बायको आणि लेकीने कशी साथ दिली यावर केदार शिंदे यांनी भाष्य केले आहे. केदार शिंदेंनी लेक सना शिंदे आणि बायको बेला शिंदेसोबतचा फोटो पोस्ट (Photo Post) करुन सांगितले आहे की…


२०१९ पासून #baipanbhaarideva या सिनेमाचा ध्यास घेतला होता. निर्माता मिळत नव्हता, त्यावेळीच्या कित्येक रात्री डोळ्यात पाणी यायचं. मनात असंख्य विचार. या सगळ्याला handle करण्याचं सामर्थ्य मिळालं ते स्वामींमुळे आणि या दोघींमुळे. आपण creative असतो तेव्हा संसार चालतो तो घरच्या गृहिणी मुळेच. बेला तर दोन जबाबदाऱ्या सांभाळते. घर आणि सिनेमा याची निर्मिती!! घरकी मुर्गी डाल बराबर समजून उपयोगाचं नाही. तो मान सन्मान दिलाच पाहिजे. तीने नेहमी मला धीर देण्याचं काम केलय. बायकांचं मन जाणून घेताना, कित्येक वेळा बायकोचं मन मी विसरून गेलो आहे. आणि माझी सना..

या सिनेमाच्या project report पासून सगळ्याची जबाबदारी तीने सांभाळली. या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेत ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पडेल ते काम करत होती. हा सिनेमा पुर्ण होऊ शकला तो सना मुळे. ६ अभिनेत्रींना मेकअप रूम मधून सेटवर आणायचं महत्त्वपुर्ण काम ती करायची. यांच्या गप्पा थांबवून हे करणं किती अवघड आहे! हे इथे लिहून समजणार नाही. #महाराष्ट्रशाहीर हा नंतर केलेला सिनेमा. पण त्यात सना confidently भुमिका करू शकली ते या ६ अभिनेत्रींचा अभिनय पाहून! हा प्रवास खडतर होता, तरी आनंददायी होता.

‘देखणा नट अन् माझा चांगला मित्र…; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक मामा झाले भावुक

आज कोट्यावधी रुपये हा सिनेमा कमावतो आहे, त्याची एक क्रेझ निर्माण झाली आहे. पण कोट्यावधी रुपयांपेक्षा मोलाची माझी टीम, त्यामुळे हे घडलं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय…अशी पोस्ट केदार शिंदे यांनी बायको आणि लेकीचे  प्रमाणात कौतुक केल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version