Baipan Bhaari Deva: सध्या मराठी मनोरंजन विश्वातील काही सिनेमे हे बॉलिवूडला (Bollywood) चांगलंच टक्कर देत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मग रितेशचा ‘वेड’ असो किंवा ‘महाराष्ट्र शाहिर.’ असे बरेच मराठी सिनेमे (Marathi Cinema) बॉक्स ऑफिसवर (box office) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहेत. आता त्यात आणखी भर पडली ती म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या मराठी सिनेमाची. सध्या महिलांच्या या जबरदस्त टोळीने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात राडा घातला आहे.
केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा ३० जूनला प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाला चाहत्यांनी खूपच प्रेम दिल्याचे दिसत आहे. रिलिजच्या एक आठवड्यानंतर या सिनेमाला चाहत्यांनी खूपच गर्दी केली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलंच धुमाकूळ घातल्याचे दिसून आले आहे. या सिनेमाने तब्बल १२ कोटींहून जास्त गल्ला कमवल्याचे दिसून आले आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब यांच्या मुख्य भूमिका साकारलेल्या या अभिनेत्रींवर चांगलंच कौतुकाचा वर्षाव झाल्याचे दिसून आले आहे. अनेक कलाकार आणि चाहते या सिनेमावर प्रतिक्रिया देत आहे.
‘बाईपण भारी देवा’ सध्या हा मराठी सिनेमा बघण्यासाठी चाहत्यांनी खुपच गर्दी केल्याचे दिसून आले आहे. त्यातच आता या सिनेमाचे दिग्दर्शिक केदार शिंदे यांनी एक भन्नाट पोस्ट देखील शेयर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की सिनेमात शशीची भुमिका साकारणाऱ्या वंदना गुप्ते यांना आता पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले जात आहे. त्या सोबतच त्यांनी एक फोटो देखील शेयर केला आहे. ज्यामध्ये एक महिला पोलिस त्यांना गाडीत टाकून घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे. या फोटोमध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘बाईपण भारी देवा या सिनेमाला फक्त महिलांची मोठी प्रमाणात गर्दी का केली जात आहे ? या प्रकरणावर आता सिनेमातील शशीला अटक करण्यात आली?
आता पुरुषांनी भरमसाठ गर्दी करत तिला तुम्हीच सोडावावं. अशा पद्धतीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, हे खूपच SOLID आहे. #baipanbhaarideva #बाईपणभारीदेवा . आता हा फोटो सोशल मिडियावर खूपच धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. तसेच आता नेटकरी या पोस्टवर मोठया प्रमाणात कमेंट देखील करत आहेत. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाविषयी सांगायचं झालं तर जिओ स्टुडियोजचा या सिनेमातुन महिलांना एक भन्नाट संदेश मिळाला आहे.
आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?
महिला फक्त आपलं कुटूंबासाठी जगत असतात. त्या जबाबदारीच्या भानात स्वत:ला वेळ देणं आणि त्यांचे स्वप्न देखील विसरुन जात असतात. हा मराठी सिनेमा प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी जगायला शिकवणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या सिनेमाचं नाव जरी ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी हा सिनेमा प्रत्येक पुरुषाने देखील नक्कीच बघायला पाहिजे. तसेच जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित आहे.