Download App

Baipan Bhari Deva’च्या अभिनेत्रींनी केदार शिंदेंच्या लेकीबद्दल म्हणाले, “कौतुक करावं तेवढं कमीच…”

Baipan Bhari Deva Film : ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे. ६ बायकांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाने १० दिवसांमध्ये बक्कळ कमाई केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केदार शिंदे (kedar shinde) यांनी केले असून सहायक दिग्दर्शिका म्हणून त्यांची लाडकी लेक सना शिंदेने (sana shinde) संपूर्ण जबाबदारीची धुरा सांभाळली आहे. सनाने सिनेमाच्या सेटवर सर्वांनाच सहकार्य केले आहे.

याबद्दल सिनेमाच्या (मराठी सिनेमा) कलाकारांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे करण्यात आले आहेत.  ‘बाईपण भारी देवा’मधील ६ मुख्य अभिनेत्रींची वेशभूषा, त्यांच्या मंगळागौर खेळत असताना साड्या, स्क्रिप्ट आणि जेवण अशा अनेक कामाची यादी सनाने चांगलीच पार पाडली आहेत. तिच्याबद्दल सांगत असताना सुकन्या मोने यांनी सांगितले आहे की, सना ही खूपच हुशार आणि शांत मुलगी आहे. तिला तिच्या संपूर्ण जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे. तिने कधीच मी एका दिग्दर्शकाची मुलगी आहे, असे वर्तन सेटवर कधीच केली नाही.


तसेच आम्ही सगळ्या तिच्या चांगल्या मावश्या होतो, असे असून देखील ती आमच्यासोबत एक दिवसही जेवायला बसली नाही. तिला तिच्या प्रत्येक गोष्टींची मर्यादा माहिती होती. सेटवर ती सहायक दिग्दर्शक म्हणूनच वावरत होती. परंतु ती नेहमीच म्हणायची मी माझ्या टीमसोबत जेवते असे सांगायची. सनाबद्दल सांगत असताना वंदना गुप्ते देखील म्हणाल्या की, सना तिच्या कामात खूपच परफेक्ट आहे. आम्हाला चुका काढायला तिने आजिबात जागा ठेवली नव्हती.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

सेटवर तिसऱ्या दिवशी मी मुद्दाम तिची एक फिरकी घेतली होती, जेवत असताना तिला यातील माझे ताट कोणते असे मी विचारले होते. यावर ती थोडी आश्चर्यचकीत झाली होती. परंतु मी तिला पुन्हा म्हणाले ताटावर माझे नाव नाही. यानंतर ती अगदी मला घाबरून म्हणाली, ‘आम्ही फक्त कपड्यांवर नावं लावली होती, जेवणावर नाही लिहली. तसेच पुढे केदार शिंदे देखील म्हणाले की, सेटवर मी कधी तिला ओरडल नाही, तर या सगळ्याजणी मिळून मला उलट ओरडत असायच्या. हे ऐकल्यावर शिल्पा नवलकर म्हणाल्या की, तुम्हाला एवढी मदत करणारी सहायक दिग्दर्शिका खरंच कोणाला मिळत नसते.

यावर शिल्पा नवलकरांनी पुढे सांगितले की, दिग्दर्शकाची मुलगी म्हणून सनाला सेटवर अजिबात सूट नसायची. व्हॅनिटीमधून आम्हाला घेऊन सेटवर जायचे ही सर्वात मोठी जबाबदारी तिच्यावर टाकण्यात आली होती. मुळात तिच्या डोक्यात विचारांचा गुंता नाही. ती एकदम सरळ विचार करत असल्याने तिच्या डोक्यामध्ये कधीच कोणता गोंधळ नसायचा,  अशा अनेक प्रकारच्या कामांबद्दल सनाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत होते.

Tags

follow us