Download App

Spiderman: ‘स्पायडरमॅन’च्या आवाजामागे ‘हा’ मराठमोळा चेहरा, जाणून घ्या याबद्दल! 

Spiderman : आपल्या मनगटातून सोडलेल्या जाळ्यांवर लटकत वेगाने प्रवास करणारा आणि गरजूंची मदत करणारा ‘स्पायडरमॅन’ (Spiderman ) आपल्या सर्वांना परिचयाचा आहेच, ‘स्पायडरमॅन’चा जगभर मोठा चाहता वर्ग आहे. चित्रपट रूपाने दर्शकांच्या भेटीला आल्यापासून ‘स्पायडरमॅन’ हा सुपरहिरो लहान-थोरांना आपलासा वाटतो.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

हाच धागा पकडून ‘स्पायडरमॅन’चा नवीन चित्रपट ‘स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ भारतात सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या भाषेत डब केला गेला आहे. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘स्पायडरमॅन’ हा स्पायडरमॅनचा मराठी भाषेत डब झालेला आणि थिएटरला (Theater) रिलीज झालेला पहिला चित्रपट आहे. मराठीत डब झालेल्या या हॉलीवूडपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक व अभिनेता असलेल्या सचिन सुरेश (Sachin Suresh) या मराठामोळ्या चेहऱ्याने सांभाळली आहे.

रेडिओ जॉकी, डबिंग या प्रवासात स्वतःला सिद्ध केल्यानंतर ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडरव्हर्स’ या अॅनिमेशनपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एका मोठ्या हॉलीवूडपटाच्या प्रोजेक्टचा भाग होता आल्याचा आनंद सचिन सुरेश याने व्यक्त केला आहे. याविषयी तो सांगतो की, “प्राईम फोकस टेक्नॉलॉजी’ ने माझ्यावर विश्वास दाखवत ही संधी मला दिली, माझ्यासाठी हा वेगळा आणि थ्रिलिंग अनुभव होता.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

डबिंग ते मिक्सिंग अशी सर्व जबाबदारी सांभाळत महिन्याभरात आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. ‘स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात विविध देशांतील ‘स्पायडरमॅन’चे अवतार पहायला मिळत असून सोबत त्याच्या भारतीय अवताराची झलकही या चित्रपटात पहायला मिळते आहे. पवित्र प्रभाकर भारतीय स्पायडरमॅनच्या भूमिकेत असून त्याचा मराठमोळा आवाज पंकज खामकर याने डब केला आहे.

Tags

follow us