Bhakshak : नेटफ्लिक्स वर नुकताच प्रदर्शित झालेला ‘भक्षक’ (Bhakshak) हा चित्रपट सध्या भरतात नंबर वन वर ट्रेंड करत आहे. यामध्ये भूमी पेडणेकर आणि सई ताम्हणकर या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची किमया दाखवली आहे. तर या चित्रपटाच्या यशानंतर भूमीने आपल्या आईबद्दल एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे.
पोटदुखी, अशक्तपणा, अन् ग्लानी तरीही जरांगे मागणीवर ठाम; उपोषणाचा सहावा दिवस
भूमी म्हणते, “माझी आई माझी सर्वात मोठी चीअरलीडर आणि माझी सर्वात मोठी टीकाकार ही आहे. म्हणून, प्रत्येक वेळी मी एखादा प्रोजेक्ट करते तेव्हा मी तिच्या रिव्ह्यूची वाट पाहते. ती खुप प्रामाणिक आहे आणि तिने मला वेळोवेळी सर्वात योग्य अभिप्राय दिला आहे. जेव्हा तिला माझा अभिनय आवडतो तेव्हा ती आश्चर्यकारकपणे गोड आणि हृदयस्पर्शी असे काहीतरी करते.
भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपात गेले अन् तपासच थांबला; महाराष्ट्रातच सर्वाधिक नेते
भूमी पुढे सांगते, “जेव्हा दम लगा के हैशा प्रदर्शित झाला. कलाकार आणि क्रू स्क्रिनिंगनंतर, माझी आई आणि मी घरी आले आणि तिने मला सोन्याचे नाणे दिले! तिला माझा अभिनय आवडला होता हे सांगण्याची तिची पद्धत होती. मला आठवते की तिला मिठी मारली आणि रडले. त्या दिवसापासून मी माझ्या कामासाठी तिच्याकडून सोन्याचे नाणे कधी मिळवणार याची वाट पाहत असते. माझ्यासाठी हा सर्वात मोठा पुरस्कार आहे.”
ती पुढे म्हणते, “म्हणून, जेव्हा मी सांड की आँख, टॉयलेट: एक प्रेम कथा, सोनचिरिया, लस्ट स्टोरीज, बाला, शुभ मंगल सावधान, बधाई दो आणि इतर काही प्रोजेक्ट्स केले आहेत. तेव्हा माझ्या आईने मला हे गिफ्ट केले आहे. माझ्यासाठी हे म्हणजे जग आहे. तिने भक्षकसाठीही तेच केले!”
Rajya Sabha : “थोडं थांबा, माझ्या निर्णयाचं गणित तुम्हालाही कळेल”; पटेलांचं सूचक वक्तव्य
भक्षकबद्दलच्या आईच्या भावनिक प्रतिक्रियेबद्दल बोलताना भूमी म्हणाली, “चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले होते. तिच्याकडे पाहून अर्थातच मला ही रडू आले. मला माझ्या दम लगा के हैशा क्षणाची आठवण झाली. मी माझ्या आईला इतके भारावलेले कधी पाहिले नाही. घरी परतताना आम्ही अजिबात बोललो नाही. मला वाटते की तिने जे पाहिले ते तिला खोलवर स्पर्श करुण गेले होते . ”
प्रतीक्षा संपली; राजकुमार रावच्या ‘SRI’ची रिलीज डेट अखेर ठरली; ‘या’ दिवशी होणार रिलीज
ती पुढे सांगते, “जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा मला एक सोन्याचे नाणे मिळाले आणि ती मला पुन्हा सोन्याचे नाणे देण्याची वाट पाहत असल्याचे मला सांगितले. माझ्यासारख्या कलाकारसाठी, जो चांगला अभिनय करण्याच्या उद्देशाने खरोखर कठोर आणि उत्कटतेने काम करतो. यासारखे हावभाव माझ्यासाठी वेगळ्या, वैविध्यपूर्ण आणि अत्यंत धोकादायक भूमिका निवडण्यासाठी प्रमाणिक करतात.
दरम्यान बॉलीवूडची यंग अभिनेत्री भूमी पेडणेकरवर भक्षक मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी कौतुक आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. या चित्रपटातील भूमीच्या अतिशय सूक्ष्म आणि चमकदार अभिनयामुळे तिची सर्वस्तरातून प्रशंसा होत आहे. जागतिक कंटेट प्लेटफार्म वर भारताला अभिमान वाटावा असा आणखी एक मैलाचा दगड भक्षकने निर्माण केला आहे. जगभरातील टॉप 5 गैर-इंग्रजी चित्रपटांपैकी हा एक आहे!