Download App

Bharat Jadhav : ‘माझ्यातल्या नटाच्या अस्तित्वासाठी मी…’ भरत जाधव पुन्हा रंगभूमीवर; भुमिकेचीही चर्चा

Bharat Jadhav : भरत जाधव (Bharat Jadhav) हा अभिनेता म्हटलं की, सर्वांनाच त्याच्या विनोदी भूमिका, विनोदी चित्रपट हेच पटकन डोळ्यसमोर येत. मात्र आता याच प्रवाहाच्या विरूद्ध जात अभिनेते भरत जाधव यांनी आपल्यातील नटाच्या अस्तित्वासाठी एक नवा प्रयोग हाती घेतला आहे. कारण भरत जाधव आता पुन्हा एकदा नाटकाकडे वळत आहेत. केवळ नाटक हाच बदल नाही. तर आता ते त्यांच्या नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत ते दिसणार आहेत. म्हणजेच ते आता विनोदीच्या एकदम विरूद्ध गंभीर भूमिका साकारणार आहेत.

‘माझ्यातल्या नटाच्या अस्तित्वासाठी मी…’

भरत जाधव यांच्या या आगामी नाटकाचं नाव देखील अस्तित्व असं आहे. त्याचबरोबर विशेष म्हणजे त्यांच्या या नाटकाची निर्मितीही भरत जाधव यांनीच केली आहे. तर यामध्ये त्यांच्यासोबत चिन्मयी सुमितसारखी दर्जेदार अभिनेत्री प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर लेखक-दिग्दर्शक स्वप्नील जाधव हे आहेत. नाटक एका कुटुंबाची गोष्ट आहे. जे स्वतः चं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. ज्यामध्ये भरत जाधव वडिलांच्या कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेत आहे.

देशाच्या डोक्यावर 173 लाख कोटींचं कर्ज, आर्थिक परिस्थितीचं कोबंड…; सुप्रिया सुळेंनी फटकारलं

त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना त्याच्या अस्तित्त्वावर कसे प्रश्न उपस्थित केले जातात? अशी ही कथा आहे. तर नाटकाची खासियत म्हणजे गेल्या कित्येक वर्षांनंतर भरत जाधव पुन्हा नाटक करत आहे. तसेच त्यातही तो त्यांच्या नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत ते दिसणार आहेत. म्हणजेच ते आता विनोदीच्या एकदम विरूद्ध गंभीर भूमिका साकारणार आहे.

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री? भाजपच्या ट्वीटमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

दरम्यान या नाटकाबद्दल नाटकाकडे पुन्हा वळण्याबद्दल भरत म्हणाला की, एकखादा अभिनेता जेव्हा एखादी भूमिका साकारतो. त्यानंतर त्याला तशीच भूमिका परत परत दिली जाते. मात्र तो इतर प्रकारच्या भूमिका देखील करू शकतो. तेसेच त्याला देखईल इतर भूमिका करण्याची इच्छा असते. मात्र एकदा एक भूमिका केली.

त्याच्या इच्छेविरूद्ध त्याच्यावर ती थोपवली जाते. त्यामुळे त्याच्या तील कलाकराला न्यान न मिळाल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे मी स्वतः च निर्माता बनून माझ्यातील नटाच्या अस्तित्त्वासाठी हे नाटक करतोय आणि त्यातही नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत ते दिसणार आहेत. म्हणजेच ते आता विनोदीच्या एकदम विरूद्ध गंभीर भूमिका साकारणार आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

Tags

follow us