देशाच्या डोक्यावर 173 लाख कोटींचं कर्ज, आर्थिक परिस्थितीचं कोबंड…; सुप्रिया सुळेंनी फटकारलं
Supriya Sule On Modi : देशावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी देशावर 55 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. गेल्या नऊ वर्षांत ते 173 लाख कोटी रुपये झालं. त्यामुळं मोदी सरकारच्या काळात तुमच्या-आमच्या डोक्यावरील कर्जात तीन पटीने वाढ झाली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यासोबतच सरकारने जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री? भाजपच्या ट्वीटमुळे राजकारणात मोठी खळबळ
सुप्रिया सुळेंनी एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, सोंग कशाचंही आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही, असं म्हणतात. आर्थिक परिस्थितीचं कोंबडं कितीही डालून ठेवलं तरीही ते आरवल्याशिवाय राहत नाही. भारताच्या आर्थिक स्थितीच हिच अवस्था आहे. सन 2014 साली 55 लाख कोटी रुपयांचे कर्ज भारताच्या डोक्यावर होतं. मात्र, 2023 संपता संपता हा आकडा दुपटीने वाढून 173 लाख कोटी इतका झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सोंग कशाचंही आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतात. आर्थिक परिस्थितीचं कोंबडं कितीही डालून ठेवलं तरीही ते आरवल्याशिवाय राहत नाही. भारताच्या आर्थिक स्थितीची हिच अवस्था आहे. सन २०१४ साली ५५ लाख कोटी रुपयांचं कर्ज भारताच्या डोक्यावर होतं मात्र २०२३ संपता संपता हा आकडा…
— Supriya Sule (@supriya_sule) October 27, 2023
त्यांनी पुढं लिहिलं की, भापजने 2014 साली देशावरील कर्ज हा निवडणूकीचा मुद्दा बनवला होता. हे कर्ज सारून अच्छे दिन आणू हा वायदा त्यांनी जनतेला केला होता. आता भाजपने या 173 लाख कोटी रुपयांच्या कर्जाबाबत खुलासा करावा. त्याचबरोबर देशाला दिलेले वचन पूर्ण करू शकलो नसल्याची कबुली देऊन माफी मागावी, अशी टीका सुळेंनी केली.
Ajit Pawar यांनी व्यासपीठावरून उठून… मोदींच्या पवारांवरील टीकेवरून देशमुख भडकले
मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या काळात देशात मोठी प्रगती झाल्याचा गवगवा केला जातो. मोदी सरकारच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी देशात भाजपकडून महाजनसंपर्क अभियान राबवले जात आहे. मात्र, याच नऊ वर्षाच्या काळात देशावर कर्जाचा डोंगर वाढल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली. त्यांच्या या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.