TDM : हात जोडत टीडीएमच्या कलाकारांची भावनिक साद, व्हिडिओ व्हायरल…

TDM News: सध्या संपूर्ण महाराष्ट्राभर TDM (टीडीएम) या सिनेमाचा जोरदार बोलबाला बघायला मिळत आहे. हा रोमँटिक सिनेमा (Romantic movies) संपूर्ण महाराष्ट्राभर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा (movies) आणि या सिनेमातील गाण्यांची क्रेझ चाहत्यावर्गामध्ये बघायला देखील मिळत आहे. ‘ख्वाडा’, ‘बबन’ फेम भाऊराव कऱ्हाडेंच्या TDM या चित्रपटाने महाराष्ट्राभर (Maharashtra) धुमाकूळ घातला आहे.   View this post on Instagram […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 01T175122.336

TDM

TDM News: सध्या संपूर्ण महाराष्ट्राभर TDM (टीडीएम) या सिनेमाचा जोरदार बोलबाला बघायला मिळत आहे. हा रोमँटिक सिनेमा (Romantic movies) संपूर्ण महाराष्ट्राभर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा (movies) आणि या सिनेमातील गाण्यांची क्रेझ चाहत्यावर्गामध्ये बघायला देखील मिळत आहे. ‘ख्वाडा’, ‘बबन’ फेम भाऊराव कऱ्हाडेंच्या TDM या चित्रपटाने महाराष्ट्राभर (Maharashtra) धुमाकूळ घातला आहे.


नेहमी अस्सल मातीतले हिरे वेचून त्यांना अभिनयाची संधी देणाऱ्या भाऊराव कऱ्हाडे यांच्या याही सिनेमाची चर्चा होती. पण TDM सिनेमाच्या टीमला मात्र वेगळ्याच मनस्ताप भोगावा लागत आहे. TDM सिनेमा बघण्याची सर्वांना मोठी उत्सुकता आहे. इतकंच नव्हे तर पुण्यात TDM चे शो हाउसफुल झाले आहेत.

परंतु सिनेमा बघण्यासाठी इच्छा असतानाही केवळ कमी शो आहेत, म्हणून TDM चाहत्यांना बघता येत नाही. आज नुकतंच TDM चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि मुख्य कलाकार कालिंदी निस्तने आणि पृथ्वीराज यांनी चाहत्यांना हात जोडून ही दयनीय अवस्था सांगितली आहे. सिनेमा चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडत आहे.

पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा

परंतु शो नसल्याने चाहत्यांना माघारी जावं लागत आहे. या अवस्थेमुळे सर्व टीमच्या डोळ्यात पाणी आले आहे. आमच्यावर प्रेशर आहे, असं म्हणत थिएटर मालकांनी हात वर केले आहेत. आता थिएटर मालकांवर नेमकं कोणत्या पद्धतीचा प्रेशर आहे, याचा खुलासा मात्र आजून देखील झाला नाही.

Exit mobile version