Bhojpuri Bawal : जिओ हॉटस्टार अन् कलर्स घेऊन येतंय ‘भोजपुरी बवाल’

भोजपुरी मनोरंजन विश्वातील सुपरस्टार्सच्या खऱ्या आयुष्याची अभूतपूर्व झलक पाहायला मिळणार असून जिओ हॉटस्टार अन् कलर्स घेऊन येतंय 'भोजपुरी बवाल' येतंय.

Untitle (30)

Untitle (30)

Bhojpuri Bawal : भारतातील पहिला प्रीमियम सेलिब्रिटी फॉलो-रिअॅलिटी शो ज्यामध्ये भोजपुरी मनोरंजन विश्वातील सुपरस्टार्सच्या खऱ्या आयुष्याची अभूतपूर्व झलक पाहायला मिळणार आहे. भोजपुरी मनोरंजन क्षेत्र आज भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि प्रचंड लोकप्रिय प्रादेशिक उद्योगांपैकी एक बनल असून संगीत, सिनेमा आणि भव्य व्यक्तिमत्त्वांच्या कलाकार यांच्या जोरावर या उद्योगाने हिंदी पट्ट्यासह देशभरात मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या सांस्कृतिक लाटेचा वेध घेत भोजपुरी मनोरंजन क्षेत्रातील मोठी नाव आता झगमगाटाच्या पडद्यामागून बाहेर येऊन प्रेक्षकांसमोर त्यांच्या आयुष्याचा सर्वात खरा आणि अनफिल्टर्ड चेहरा सादर करण्यास सज्ज आहेत.

जिओहॉटस्टारवर स्ट्रीम होणारी आणि कलर्स टीव्हीवर प्रसारित होणारी ही मालिका प्रेक्षकांना काहीतरी वेगळा अनुभव देऊन जाणार यात शंका नाही तर कलाकारांच्या आयुष्यातील एक खास बाजू या निमित्तानं प्रेक्षकांना अनुभवता येईल. भोजपुरी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध मोठी नाव असलेले कलाकार यात दिसणार असून पवन सिंह, दिनेश लाल यादव (निरहुआ), आम्रपाली दुबे, काजल राघवानी आणि तेज प्रताप यादव यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची खास झलक यात पाहायला मिळेल. पारंपरिक रिअॅलिटी शोच्या तुलनेत ही मालिका एक अनोखा ‘फॉलो रिअॅलिटी’ फॉरमॅट सादर करणार असून ज्यात कोणतीही टास्क, एलिमिनेशन्स किंवा कृत्रिम ड्रामा नाही तर त्याऐवजी कॅमेरे या कलाकारांच्या दैनंदिन आयुष्यातील खास गोष्टी प्रेक्षकांना त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा जवळून अनुभव देतील. प्रसिद्धी, चाहतावर्ग, कौटुंबिक दबाव, महत्त्वाकांक्षा, स्पर्धा, उत्सव, वाद आणि सुपरस्टारडममागील अथक संघर्ष “भोजपुरी बवाल” हे सर्व वास्तव स्वरूपात दाखवणार आहे.

या घोषणेबाबत बोलताना जिओस्टारचे हिंदी आणि इंग्रजी मनोरंजन व्यवसाय (स्ट्रीमिंग, टीव्ही आणि स्टुडिओ) प्रमुख आलोक जैन म्हणाले “जिओहॉटस्टार हे भारतातील अनस्क्रिप्टेड प्रोग्रामिंगसाठीचे प्रमुख व्यासपीठ आहे जिथे विविध प्रकारच्या नॉन-फिक्शन कथा सादर केल्या जातात. कैद-आधारित रिअॅलिटी, कॉमेडी, टॅलेंट शो, नातेसंबंधांवर आधारित मानवी कथा अशा अनेक फॉरमॅट्समध्ये आम्ही सातत्याने नावीन्य आणले आहे.

America Iran War : …तर इराणचं प्रत्युत्तर विध्वंसक असेल, शांतीप्रस्तावानंतरही अमेरिकेला थेट धमकी!

‘भोजपुरी बवाल’द्वारे आम्ही आणखी एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहोत भोजपुरी उद्योगातील मोठ्या स्टार्सच्या खऱ्या आयुष्यावर आधारित पहिल्यांदाच सादर होणारा ‘फॉलो-रिअॅलिटी’ फॉरमॅट प्रेक्षकांना अनुभवयला मिळणार आहे. भोजपुरी मनोरंजन हे हिंदी हृदयभूमीतील सर्वात प्रभावशाली आणि जिवंत शक्तींपैकी एक आहे आणि हा शो त्याची भव्यता, भावना आणि अस्सलपणा केवळ भोजपुरी प्रेक्षकांसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी घेऊन येत आहे” सेलिब्रिटींच्या आयुष्यातील खास क्षण आणि भावनिक वास्तवता यांचा संगम साधत “भोजपुरी बवाल” प्रेक्षकांना भारतातील सर्वात प्रभावशाली प्रादेशिक मनोरंजन उद्योग घडवणाऱ्या कलाकारांच्या आयुष्याचा जवळून अनुभव देण्याचे आश्वासन देतो.

Exit mobile version