America Iran War : …तर इराणचं प्रत्युत्तर विध्वंसक असेल, शांतीप्रस्तावानंतरही अमेरिकेला थेट धमकी!

अमेरिका शांतीप्रस्तावाच्या आडून मोठ्या हल्ल्याच्या तयारी असल्याचा गंभीर आरोप इराणी संसदीय स्पीकर मोहम्मद गालिबाफ यांनी केलायं.

Untitle (25)

America Iran War : अमेरिका शांतीप्रस्तावाच्या आडून मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असून हल्ला झाल्यास इराणचं प्रत्युत्तर विध्वंसक असेल, अशी थेट धमकीच इराणी संसदेचे स्पीकर मोहम्मद गालिबाफ (Mohmmamd Galibaf) यांनी दिलीयं. इराणने अमेरिकेला 14 पानी शांतीप्रस्ताव पाठवला होता, मात्र अमेरिकेने हा प्रस्ताव फेटाळून आपला दुसरा शांती प्रस्ताव पाठवलायं. अमेरिकेच्या शांती प्रस्तावावर इराणच्या संसदीय स्पीकरने अमेरिकेला थेट धमकीच दिलीयं.

हिंदू-मुस्लिम राजकारणानेच निवडणुका जिंकत नाहीत…, भाजपच्या विजयावर प्रदीप गुप्ता यांचे विश्लेषण

अमेरिकेच्या शांतीप्रस्तावावर इराणचं अविश्वासाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे. इराणी संसदेचे स्पिकर यांनी अमेरिका शांती प्रस्तावाच्या आडून मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचं म्हटलंय. तसेच युद्धविरामातही अमेरिका हल्ल्याच्या तयारीत असून हल्ला झाल्यास इराणचं प्रत्युत्तर विध्वंसक असेल, असं ते म्हणाले आहेत. पाकिस्तानात झालेल्या शांतता बैठकी इराणचे संसदीय स्पीकर मोहम्मद गालिबाफ उपस्थित होते.

‘बाप्या’ मधील राजश्री देशपांडेच्या लूकची चर्चा; शैलजापासून शैलेशपर्यंतचा प्रवास ठरतोय खास

इराणने पाठवलेला शांतीप्रस्ताव अमेरिकेने फेटाळला असून त्यानंतर आता अमेरिकेकडून नवा प्रस्ताव देण्यात आलांय. प्रस्तावानुसार अमेरिका 25 अब्ज डॉलर देण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून नाकेबंदी मागे घेण्याची ऑफर असून इराणने 400 किलोग्रॅम युरेनियम हटवून 3.67 टक्क्यांपर्यंत युरेनियम समृद्धीकरण करावं, असंही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान, आता इराण हा शांती प्रस्ताव स्विकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं असून अमेरिका इराणच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. अमेरिकेच्या शांती प्रस्तावानंतर तेलाचे दर पाच टक्क्यांनी घटले आहेत. दर 105 डॉल प्रति बॅरलवर आले आहेत.

मोटेगावकरांच्या अटकेनंतर विद्यार्थी संघटना आक्रमक; ‘आरसीसी’ क्लासेसच्या फलकांची तोडफोड

अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर हल्ला करु नका, अशी विनंती केलीयं. या विनंतीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या इराणवरील हल्ल्याला तुर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता सध्या तरी अमेरिका-इराणमधील संघर्ष थांबला असला तरीही पुढील काळात हा संघर्ष तापणार असल्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सध्या महत्त्वाची चर्चा सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आखातमधील कतार, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिराती (UAE) या आखाती देशांच्या प्रमुखांनी अमेरिकेला इराणवर तातडीने लष्करी कारवाई न करण्याची आग्रहाची विनंती केली होती. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये सकारात्मक प्रगती होत असून, यातून अमेरिकेला मान्य होईल असा मार्ग निघू शकतो, असं आखाती देशांनी ट्रम्प यांना सांगितले आहे.

follow us