Download App

‘भूल भुलैया 3’ची बॉक्स ऑफिसवर 200 कोटी पेक्षा जास्त कमाई, टीमने केले जंगी सेलिब्रेशन!

'भूल भुलैया 3' च्या यशानंतर भूल भुलैया 3 च्या पाठीमागील टीम नुकतीच मुंबईत या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठी जमली होती.

  • Written By: Last Updated:

Bhool Bhulaiyaa 3 : दिवाळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये कार्तिक आर्यनचा (Karthik Aryan) ‘भूल भुलैया 3 (Bhool Bhulaiyaa 3 ) हा बहुचित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. दरम्यान, या यशानंतर भूल भुलैया 3 च्या पाठीमागील टीम नुकतीच मुंबईत या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठी जमली होती. या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या दहा दिवसांत २००+ कोटींची कमाई केली.

Teosa Vidhansabha : मतदारसंघाच्या विकासालाच प्रथम प्राधान्य, यशोमती ठाकूरांनी सांगितलं व्हिजन 

भूषण कुमार यांनी सुरू केलेला आणि अनीस बज्मी दिग्दर्शित प्रोजेक्ट फ्रँचायझीमधील या तिसऱ्या भागाने सगळ्यांची मन जिंकली. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिस रेकॉर्डच मोडीत काढले नाहीत तर विनोद, थरार आणि नॉस्टॅल्जियाच्या परिपूर्ण मिश्रणाने प्रेक्षकांनाही मोहित केले आहे.

कर्डिलेंचा राहुरीत प्रचार दौरा; नागरिकांशी संवाद, दिला विकासाचा शब्द.. 

कार्तिक आर्यन 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा सर्वात तरुण सुपरस्टार ठरला आहे. तर बॉलीवूडच्या माधुरी दीक्षित, विद्या बालन, तृप्ती दिमरी यांच्यासोबत चित्रपटाच्या यशाला चार चांद लागले आहेत.

हे मेगा-सेलिब्रेशन एक अविस्मरणीय रात्र ठरली यात शंकाच नाही. कलाकार आणि क्रू यांनी कार्यक्रमात खास हजेरी लावली होती. भूल भुलैया 3 हा या वर्षातील सर्वात मोठ्या बॉलीवूड हिट गाण्यांपैकी एक म्हणून आपले स्थान पक्के करत प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

दरम्यान, ‘भूल भुलैया 3’ हा 2007 मध्ये आलेल्या ‘भूल भुलैया’ चित्रपटाचा तिसरा भाग आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. 2022 च्या सिक्वेलमध्ये अक्षयची जागा कार्तिक आर्यनने घेतली. अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 3’ मध्ये कार्तिकने रूह बाबा ही भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हॉरर कॉमेडी असलेल्या भूल भुलैया 3 मध्ये कार्तिकसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत.

follow us