Download App

Bhool Bhulaiyaa 3: मंजुलिका रुहबाबाला पछाडणार? ‘भूल भूलैय्या 3’चा भयानक टीझर प्रदर्शित

Bhool Bhulaiyaa 3 Teaser: कार्तिक आर्यनचा (Karthik Aaryan) मोस्ट अवेटेड चित्रपट 'भूल भुलैया 3' चा टीझर रिलीज झाला आहे.

Bhool Bhulaiyaa 3 Teaser: कार्तिक आर्यनचा (Karthik Aaryan) मोस्ट अवेटेड चित्रपट ‘भूल भुलैया 3’ चा टीझर रिलीज झाला आहे. (Bhool Bhulaiyaa 3 Teaser) टीझरमध्ये मंजुलिकाची भूमिका साकारणारी विद्या बालन (Vidya Balan) आणि रूह बाबाची भूमिका साकारणारा कार्तिक आर्यन यांची झलक पाहायला मिळत आहे. तर निर्मात्यांनी माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) यांचा लूक उघड केलेला नाही. सध्या सिनेमाचा भयानक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

आता सोशल मीडियावर (social media) सिनेमाचा टीझर शेअर करताना कार्तिकने लिहिले, ‘तुला वाटले की कथा संपली आहे? रूह बाबा विरुद्ध मंजुलिका…या दिवाळीत आम्हाला जाणून घेऊया की, लोकांना या लढतीची पहिली झलक कशी आवडली.

चाहते काय म्हणत आहे?

‘भूल भुलैया 3’चा टीझर चाहत्यांना आवडला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका यूजरने लिहिले टीझरमध्ये एक छोटासा सीन दाखवण्यात आला आहे, पण तो रंजक आहे. आमची मूळ मंजुलिका परत आली आहे, तीही तिप्पट शक्तीने.’ दुसऱ्याने लिहिले, ‘हा टीझर आहे, चित्रपट बाकी आहे.’ मजा आली.’ तिसऱ्याने लिहिले, ‘माधुरी दीक्षितच्या नावावर एवढा सस्पेन्स, प्लीज एक झलक दाखवा बाबा.’

बॉक्स ऑफिसवर टक्कर

कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ हा चित्रपटही दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. म्हणजेच दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर होणार आहे.

‘Bhool Bhulaiyaa 3 सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज, कधी? कुठे? बघता येईल जाणून घ्या

कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार 

थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंग होईल. ‘भूल भुलैया 3’चा स्ट्रीमिंग पार्टनर नेटफ्लिक्स असल्याचं पोस्टरवर दिसत आहे. अभिनेता कार्तिक आर्यननं बुधवारी 25 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर त्याच्या हॉरर-कॉमेडी चित्रपटामधील पहिलं पोस्टर रिलीज केलय. व्हायरल झालेल्या या पोस्टरवरून हे स्पष्टपणे दिसत आहे की, पुन्हा एकदा मंजुलिकाची सावली कुटुंबातील सदस्यांवर पडेल. यानंतर कार्तिक आर्यन जो रूह बाबा बनला आहे, तिच्याबरोबर लढताना दिसेल. दरम्यान या पोस्टवर कार्तिकनं लिहिलं, ‘दार उघडेल…या दिवाळीत, ‘भूल भुलैया 3’. दरम्यान बॉक्स ऑफिसवर ‘भूल भुलैया 3’ची ‘सिंघम अगेन’बरोबर टक्कर होईल.

follow us