Download App

Bigg Bigg 17: विकी जैनने पहिल्यांदाच केला सुशांतसिंहचा उल्लेख; म्हणाला, ‘तुमच्या नात्याबद्दल… ‘

Bigg Boss 17: सलमान खानचा (Salman Khan) सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस 17 (Bigg Boss) मध्ये दररोज नवनवीन नाटकं पाहायला मिळत आहेत. जसजसा फिनाले जवळ येत आहे, तसतसा हा शो अधिक रंजक होत आहे. या आठवड्यात करण जोहरने वीकेंड का वार होस्ट केले आहे. यावेळी त्यांनी काही स्पर्धकांना खडे बोल सुनावले. या यादीत अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) पती विकी जैन (Vicky Jain) याचेही नाव आहे.


अंकिता-सुशांतच्या नात्यावर विकी जैन बोलला: करणने विकीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला की, जेव्हा तुझी आई अंकिताला खडसावत होती, तेव्हा तू तुझ्या पत्नीची भूमिका का घेतली नाहीस? त्यावेळी विकी आणि करण जोहरने याबाबत माफी मागितली होती. पण करणच्या जाण्यानंतर विकीही गप्प बसला नाही. याबाबत त्याने अंकिताशी बोलून आपला राग काढला आहे.

तो अंकिताला म्हणाला की, माझ्या घरच्यांनी तुला कधी काही थांबवलं का किंवा तुझ्या पोशाखाबद्दल काही बोललं का? लग्नानंतर 10 दिवसही तू माझ्या कुटुंबासोबत राहिली नाहीस. यावर त्यांनी कोणताही आक्षेप व्यक्त केला नाही. विकीने अंकिताचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतचाही उल्लेख करत म्हणाला की, ‘मी तुझ्या कुटुंबासोबत राहायला आलो, तेव्हा मी श्रीमंत जावईसारखा राहिलो की मुलासारखा? मी नेहमीच तुमच्या कुटुंबासाठी उभा राहिलो.

Prabhas : काळं शर्ट, लुंगी अन् बरचं काही, प्रभासच्या ‘द राजा साब’ची पहिली झलक समोर

विकी पुढे म्हणाला की, ‘जेव्हा मी तुझ्या आयुष्यात आलो तेव्हा सुशांत आणि तुझ्या नात्याची सगळीकडे चर्चा होती. त्या सर्व परिणाम मला भोगावे लागले. मी पण ते सर्व स्वतःवर घेतले. जेव्हा तुला माझ्याशी खूप त्रास होतो, तेव्हा तू माझ्याशी लग्न का केलेस? माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय तुझा होता. विकीचे बोलणे ऐकून अंकिताने पुन्हा पतीला सॉरी म्हटले. यावर विकीने देखील म्हणलं की, सॉरी काहीही गोष्टी दुरुस्त होत नाहीत. असं म्हणत विकीने नॅशनल टेलिव्हिजनवर त्याची नाराजी दर्शवली आहे.

follow us