Download App

Abdu Rozik On TV Debut: बिग बॉस गाजवणारा अब्दू झळकणार छोट्या पडद्यावर, फॅन्सना उत्सुकता 

Abdu Rozik On TV Debut: बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये अब्दू रोजिकने (Abdu Rozik) आपल्या कॉमेडी शैलीने सर्वांची मने जिंकली आहेत. यानंतर तो ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये पाहुणा म्हणून दिसला होता. (shabbir ahluwalia) त्याचवेळी अब्दु रोजिक आता हिंदी टेलिव्हिजनवर छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. ताजिकिस्तानी गायक लवकरच (Pyar Ka Pehla Naam Radha Mohan) ‘प्यार का पहला नाम: राधा मोहन’ मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये शब्बीर अहलुवालिया आणि निहारिका रॉय हे मुख्य भूमिकेत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, ‘प्यार का पहला नाम: राधा मोहन’ या शोच्या सूत्राने सांगितले आहे की, ‘आगामी ट्रॅकमध्ये मोहन (शब्बीर अहलुवालिया) आणि तुलसी (कीर्ती नागपुरे) यांची मुलगी गुनगुन (रीजा चौधरी) तिचा उत्सव साजरा करताना दिसणार आहेत. तसेच दामिनी (संभान मोहंती) अब्दूला गुनगुनचे अपहरण करण्यासाठी पाठवते, नंतर कळते की अब्दूच्या पात्राचा गुनगुनला इजा करण्याचा हेतू नव्हता. परंतु पैशासाठी दामिनीच्या आदेशाचे पालन करत आहे. गुनगुन आणि अब्दू नंतर चांगले मित्र झाल्याचे देखील दिऊन येणार आहे आणि तो तिला पुन्हा दामिनीपासून वाचवणार आहे. अब्दुल उद्यापासून या कॅमिओ ट्रॅकच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

अब्दू रोजिकने लोडेड बंदूक घेऊन खेळल्याच्या बातमीविषयी देखील भाष्य केले आहे. अब्दू नुकतेच केपटाऊनमध्ये त्यांचे मित्र आणि शिव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी गेले होते. गेल्या महिन्यात, तो अब्दू रोजिकच्या मुंबईतील रेस्टॉरंटच्या लॉन्चिंगच्या वेळी लोडेड बंदूक घेऊन खेळल्याबद्दल एफआयआर नोंदवल्याबद्दल चर्चेत होता. मात्र, काही लोक खोटेपणा पसरवून त्यांचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले.

धर्मग्रंथांना तरी सोडा; सेन्सॉर बोर्ड काय करतं? न्यायालयाने आदिपुरुषच्या निर्मात्यांसह सेन्सॉर बोर्डलाही फटकारलं

तसेच या घटनेबद्दल बोलताना अब्दू म्हणाले की, “लाँचच्या वेळी मी सुरक्षा रक्षकाला विचारले की तो घेऊन जात असलेली बंदूक खरी आहे की बनावट आहे. त्याने ते माझ्या हातात दिले आणि म्हणाले, ‘तुम्ही बघा’ मी ते काही सेकंद धरून ठेवले आणि लगेच परत केले आहे. परंतु काही लोकांनी माझ्या हातात बंदूक धरलेले फोटो क्लिक केले आणि ते प्रसारित केले. माझ्यावर एफआयआर किंवा गुन्हा दाखल झालेला नाही. काही तणावामुळे मी आजारी पडलो. मला भीती होती की माझा व्हिसा रद्द होईल आणि मी भारतात परत येऊ शकणार नाही, म्हणून मी स्वतः पोलिसांकडे गेलो आणि त्यांना सांगितले की मी काहीही चुकीचे केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Tags

follow us