Download App

Bigg Boss 17 : “दिशा सालियनचा मृत्यू हा…” अभिनेत्री अंकिता लोखंडेने केला धक्कादायक खुलासा

Bigg Boss 17 Ankita Lokhande: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) सध्या कलर्स टीव्हीच्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 17’ साठी (Bigg Boss 17) जोरदार चर्चेत आहेत. या शोमध्ये दोघांमध्ये खूप वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या शोला 11 आठवडे पूर्ण झाले आहेत आणि या काळात अंकिता तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा धक्कादायक खुलासा केली आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) अंकिता अनेकदा खूप काही सांगताना पाहायला मिळाली आहे. अंकिता तिच्या आणि सुशांतच्या लव्ह लाईफबद्दल खूप बोलली आहे. तिने तिच्या ब्रेकअपच्या क्षणापूर्वी पहिल्या भेटीबद्दल सांगितले आहे. आता अलीकडेच, अंकिताला तिच्या आयुष्यातील तो काळ आठवला जेव्हा तिला सुशांतच्या निधनाची बातमी कळताच मोठा धक्का बसला होता.


अभिनेत्री दिशा सालियन प्रकरणाबद्दल (Disha Salian Case) मोठा खुलासा केली आहे. नुकतचं अंकिता आणि मुनवर फारुकी बिग बॉसच्या बागेत बसून बोलत होते. यादरम्यान मुनव्वरने अंकिताला विचारले की ती सोशल मीडियावर चाहत्यांना ब्लॉक करते का? यावर अंकिता म्हणाली, ‘हो, मी अनेकांना ब्लॉक करते. मला यापूर्वीही ब्लॉक करण्यात आले आहे. त्यावेळी मी अनेकांना ब्लॉक केले होते. कारण मला खूप घाणेरडे म्हटले जात होते. आणि मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात होत, मला ते सहन होत नव्हते. मी ब्लॉक केले. मला अशा गोष्टी सांगितल्या गेल्या ज्या मी स्वीकारू शकत नाही. सुशांतशी संबंधित चाहते मला नेहमी ट्रॉल करायचे. जणू काही मीच नाही त्याच्या आयुष्यात. यावर मुनव्वर म्हणाले की, ‘तो काळ खूप वाईट होता. अंकिता पुढे म्हणते, ‘तो खूप कठीण काळ होता. हे सगळं झालं तेव्हा मी त्याच्या आयुष्यात नव्हते.

दिशा सालियनबद्दल अभिनेत्री काय म्हणाली? मुनव्वरने अंकिताला पुढे विचारले, ‘सुशांतच्या मॅनेजरचा मृत्यू त्याच्या मृत्यूपूर्वी झाला होता की त्याच्या मृत्यूनंतर?’ यावर अंकिता म्हणाली की नाही, मॅनेजरचा मृत्यू त्याच्या मृत्यूपूर्वी झाला होता. ती त्याची मॅनेजर नव्हती. तिने एकदा त्याला 5-6 दिवस सांभाळले होते, पण ती त्याची मॅनेजर नव्हती.

बॉक्स ऑफिसवर प्रभासचा डंका लवकरच 625 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री, सालारची कमाई किती?

अंकिता पुढे म्हणाली, ‘जेव्हा मी सुशांतचा मृत्यूनंतरचा शेवटचा फोटो पाहिला, तेव्हा सर्व काही संपले होते. त्याने बरेच चित्रपट केले आणि तेही संपले. त्याचा एक फोटो होता जो खूप वाईट होता. माझे हात पाय थंड पडत होते. मी त्याच्यासोबत असताना किंवा नसताना काही फरक त्याला पडत नव्हता. त्यामुळे मी तुटत गेले’. तो माझ्या बाबतीत कायम झोपला आहे असे वाटत होते. मी नुसतं ते चित्र बघत राहिले आणि विचार करू लागले की, त्याच्या मनात नेमकं काय चाललंय. मी त्याला चांगलेचं ओळखत होते. त्याच्या मनात खूप काही आलं असेल पण ते सगळं नाहीसं झालं. मग तू काहीच नाहीस, फक्त एक शरीर आहेस, असं मला वाटायला लागलं होत.

follow us

वेब स्टोरीज