दिशा सालियन प्रकरणात ट्विस्ट, दिशाच्या लॅपटॉपमधून धक्कादायक माहिती; व्हॉट्सअप डेटा कुणाचा?

दिशा सालियन प्रकरणात ट्विस्ट, दिशाच्या लॅपटॉपमधून धक्कादायक माहिती; व्हॉट्सअप डेटा कुणाचा?

Disha Salian Case : राज्याच्या राजकारणात दिशा सालियन मृ्त्यू प्रकरण (Disha Salian Case) चर्चेत आहे. या प्रकरणात आता एक महत्वाची माहिती हाती आली आहे. दिशाच्या लॅपटॉपमध्ये तिचे वडील सतीश सालियन यांचा व्हॉट्सअॅप डेटा मिळाल्याची माहिती आहे. आधीच्या एसआयटी चौकशी दरम्यान हा डेटा मिळाला होता. आता या डेटात नेमकी काय माहिती आहे, याची माहिती पोलीस तपासातूनच समोर येणार आहे.

दिशा सालियन प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आमदार आदित्य ठाकरे, अभिनेता दिनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करुन तपास सीबीआयकडे द्यावा. तसेच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही सालियन कुटुंबावर दबाव टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

दिशा सालियन प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मास्टरमाईंड?, नेमकं काय घडतंय..

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मास्टरमाईंड?

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात (Disha Salian Case) मोठा ट्विस्ट आला आहे. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत मुलीच्या मृत्यूमागे सामूहिक बलात्कार आणि खून असल्याचा गंभीर आरोप केलाय. मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सदर प्रकरणातील तथ्ये लपवल्याचा गंभीर आरोप करत परमबीर सिंग मास्टरमाईंड असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे दिशा सालियन प्रकरणात पोलीस दलातील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नावाचा वारंवार उल्लेख होत असल्यामुळे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मास्टरमाईंड आहेत की नाही याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.

दिशा सालियन प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन वडील सतीश सालियन आणि वकील नीलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेतली. मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात त्यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर या प्रकरणातील तथ्ये लपवल्याचा गंभीर आरोप केला होता तसेच तेच मास्टरमाईंड असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

दिशा सालियन प्रकरणात 1 लाख कोटींच्या मानहानीचा दावा ठोकणार; अॅड. निलेश ओझा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube