Ankita Lokhande: भारतीय मनोरंजन (Entertainment) उद्योगातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) तिचा पती विकी जैन सोबत ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17 ) च्या घरात प्रवेश करून जोरदार चर्चेत आली आहे. डिसेंबर 2021 मध्ये लग्न करणारे हे जोडपे या सीझनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक आहेत. पण टीव्ही आणि चित्रपटांमधील यशस्वी कारकीर्दीनंतर अंकिता लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये का सामील झाली? तिने ‘बिग बॉस मध्ये येण्याचा निर्णय का घेतला हे तिने स्पष्ट केले आहे.
अंकिताने बिग बॉस 17 मध्ये सहभागी होण्याच्या तिच्या निर्णयामागील खरे कारण उघड केले आहे, अंकिता म्हणते “मी बिग बॉस 17 शोमध्ये आली आहे. कारण लोक मला अर्चना म्हणून ओळखतात, आता त्यांनी अंकिताला ओळखावे माझी खरी ओळख अंकिता म्हणून व्हावी अशी माझी इच्छा आहे. मी जशी आहे तस मला लोकांनी स्वीकारावं अस वाटत, असे तिने यावेळी सांगितलं आहे.
अंकिता “पवित्र रिश्ता” मधल्या अर्चना देशमुखच्या तिच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. अंकिताने 2009 ते 2014 पर्यंत 5 वर्षे अर्चनाची मुख्य भूमिका केली आहे आणि तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार आणि कौतुकाची थाप मिळवली आहे. अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 मधील सर्वात लोकप्रिय आणि प्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. तिला तिच्या चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील मित्रांकडून खूप पाठिंबा आणि कौतुक मिळत आहे. शोमध्ये तिच्या उपस्थितीने प्रेक्षक खऱ्या अंकिता लोखंडेला बघण्यासाठी उत्सुक आहेत.
Aamir Khan: आमिर खान मुंबईला रामराम ठोकणार? नेमकं प्रकरण काय?
‘पवित्रा रिश्ता’मुळे अंकिता व सुशांत सिंह राजपूतमध्ये जवळीक वाढली होती. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतु, काही कारणांमुळे ते वेगळे झाले. त्यानंतर अंकिताने २०२१मध्ये व्यावसायिक विकी जैनशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.