Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांच्यात मतभेद होत आहेत. नुकतचं अंकिता आणि विकी सोशल मीडियावर घरातील दाखवणारी पोस्ट सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाली आणि यावर अनेक आरोप- प्रत्यारोप देखील झाले मात्र प्रेक्षकांनी अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना पाठिंबा दर्शविला आहे.
नील-ऐश्वर्याच्या डिजिटल टीमने अंकिता आणि विकीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्यावर या जोडप्याच्या चाहतावर्गाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया निर्माण झाल्यामुळे हा वाद टोकाला गेला आहे. वादाचा मुख्य मुद्दा नील आणि ऐश्वर्याच्या अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओभोवती चर्चा झाल्या आणि त्यासोबत अंकिता आणि विकीच्या नातेसंबंधातील दुराव्याबद्दल प्रकाश टाकणारी एक प्रेस नोट देखील समोर आली आहे.
प्रेक्षकांनी त्यांचा असंतोष व्यक्त केला असून नील आणि ऐश्वर्याच्या टीमने त्यांची स्वतःची प्रतिमा चांगली करण्यासाठी या जोडप्याचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. “विकी अंकिताच्या नात्याबद्दल बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? जर तुम्ही नीलची तुलना विक्कीसोबत केली असेल तर तुम्ही ऐश्वर्या आणि अंकिता यांच्या वर्तनाची तुलना केली असेल. तुम्ही सेलिब्रिटी आहात दुसऱ्याच्या नात्यात ढवळाढवळ करू नका, अशी टीका सध्या त्यांच्यावर होत आहे.
KBC मध्ये शाहरुख खानबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर देण्यात सुहाना अपयशी; तुम्ही देऊ शकाल का?
अंकिता लोखंडेबद्दल जाणून घ्या…
अंकिता कायम सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या सिरियलच्या माध्यमातून अंकिता घराघरात पोहोचली. ‘पवित्र रिश्ता’सह ‘झलक दिखला जा 4′,’ कॉमेडी सर्कस’ आणि ‘एक थी नायिका’ या रुपेरी पडद्यावरील कार्यक्रमांतदेखील अंकिताने काम केलं आहे. आता अंकिताच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.
विकी जैनबद्दल जाणून घ्या…
विकी जैन हा छत्तीसगड येथील रायपुर येथील राहणारा आहे. तो एक व्यावसायिकी आहे. मात्र कामामुळे तो मुंबईत असतो. मीडिया रिपोर्टनुसार, विकी जैनचं खरं नाव विकास कुमार जैन असे आहे. विकीच्या वडिलांचं नाव विनोद कुमार जैन असून आईचं नाव रंजना जैन असे आहे. विकीचं संपूर्ण शिक्षणंही मुंबईत झालं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकी जैनने व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. ‘महावीर कोल वॉशरीज प्राइवेट लिमिटेड’ या कंपनीचा तो एमडी होता. तसेच महावीर इंस्पायर ग्रुपचा तो आता को-ओनरदेखील आहे.