Bigg Boss 20 : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो पैकी एक असणारा बिग बॉस पुन्हा एकदा चाहत्यांसाठी येत आहे. बिग बॉस 20 ची अधिकृत घोषणा करण्यात देखील करण्यात आली आहे. या शोच्या प्रीमियरची तारीख जाहीर करणारा अधिकृत प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोची सुरुवात सलमान खानच्या (Salman Khan) ‘करण अर्जुन’ चित्रपटातील लूकने होते, ज्यात तो घोड्यावर स्वार होऊन एन्ट्री करतो. त्यानंतर तो घोषणा करतो, “‘करण अर्जुन’मध्ये जे घडलं होतं, तेच पुन्हा घडणार. तथास्तु!”
‘बिग बॉस 20’ कधी सुरू होणार?
‘बिग बॉस 20’ चा प्रीमियर 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा शो रात्री 9 वाजता ‘जिओहॉटस्टार’ (JioHotstar) वर स्ट्रीम होईल आणि रात्री 10:30 वाजता ‘कलर्स टीव्ही’ (Colors TV) वर प्रसारित होईल.
श्रीलंका दौऱ्यानंतर गौतम गंभीरची हकालपट्टी? BCCI अॅक्शन मोडवर
‘बिग बॉस 20’ मधील संभाव्य स्पर्धक
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार बिग बॉस 20 साठी आतापर्यंत जन्नत जुबेर, उर्फी जावेद, फैसल शेख (मिस्टर फैसू), अंजली अरोरा, कुशल तन्वर (गुलू), रुरू ठाकूर, सँटी शर्मा आणि रिधिमा गुप्ता (रेधिमा) यांना संपर्क साधण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही नावांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
