पेपरफुटी गंभीर समस्या, आंदोलन हाच योग्य मार्ग.., विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवर सलमान खान नेमकं काय म्हणाला?

Salman Khan On Students Protest : नीट पेपर फुटी प्रकरणात देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी

Salman Khan On Students Protest

Salman Khan On Students Protest : नीट पेपर फुटी प्रकरणात देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. आता हे आंदोलन फक्त जंतर मंतर पुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशात सुरु आहे. या आंदोलनाला आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेकांनी पाठिंबा दिला आहे. यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा देखील समावेश आहे. एकीकडे अनेक जण या आंदोलनाला पाठिंबा देत आहे तर दुसरीकडे आतापर्यंत बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते सलमान खान, अक्षय कुमार, शाहारुख खान यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने त्यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे.

तर आता या प्रकरणात बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानची (Salman Khan) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सलमानने सोशल मीडियावर याबाबात आपले मत व्यक्त करत या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच या मुद्द्यावरुन होणाऱ्या राजकारणावरुन चिंता व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर सलमान खानने (Salman Khan On Students Protest) लिहिले की, ही एक अत्यंत शांततापूर्ण चळवळ होती. तिला हिंसक वळण लागले ही दुर्दैवी बाब आहे. ज्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना दुखापत झाली आहे, त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती वाटते.

पेपरफुटी ही अत्यंत गंभीर समस्या आहे आणि आपल्या देशातील तरुण आपल्या पालकांच्या पाठिंब्याने चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र येत आहेत, हे पाहून मला आनंद होत आहे. त्यांनी उचललेल्या पावलांचे मी कौतुक करतो. यातून त्यांची अभ्यासाप्रती असलेली निष्ठा, चांगल्या भविष्यासाठीची कटिबद्धता आणि सुशिक्षित भारत घडवण्याची प्रामाणिकता व उत्सुकता दिसून येते. ही चळवळ, हे आंदोलन हाच योग्य मार्ग आहे आणि विद्यार्थ्यांनी ते शांततापूर्णरीत्या पार पाडले आहे. हे खरोखरच धैर्य आणि शौर्याचे लक्षण आहे. शिक्षणाबाबत अत्यंत उत्साही आणि प्रेरित असलेली ही पिढी भारताचे नाव नक्कीच उंचावेल.

राजकारण नको

तर या मुद्दयाचे राजकारण नको असं देखील सलमान खाने सोशल मीडियावर लिहिले आहे. हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित आहे. याचे राजकारण होऊ नये. मला खात्री आहे की सरकार त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि एक उत्तम शिक्षण व्यवस्था निर्माण करेल. ही दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर अशी स्थिती असेल. मी आशा करतो आणि प्रार्थना करतो की यावर एखादा अर्थपूर्ण निर्णय घेतला जाईल. ज्यांना आपले शिक्षण पूर्ण करायचे आहे, त्या सर्वांवर ईश्वराची कृपा असो.

गुंतवणुकीसाठी संधी, ‘या’ राशींंना होणार फायदा; जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल?-

शिक्षण ही आपली पुढील ‘ट्रेंड’ आणि ‘फॅशन’ बनली पाहिजे. अशी गोष्ट जी प्रत्येक सरत्या वर्षासोबत अधिक लोकप्रिय आणि फॅशनेबल होत जाईल. त्यांनी अशा एका परिस्थितीची कल्पना केली होती जिथे परदेशातील लोक शिक्षणासाठी भारतात येतील आणि यामुळे देश जागतिक शिक्षण केंद्र बनेल असं सोशल मीडियावर सलमान खानने लिहिले आहे.

follow us