बिग बॉस मराठी 3 चा उपविजेता जय दुधाणेला लग्नानंतर काही दिवसांतच मुंबई एअरपोर्टवरून अटक

पाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात बिग बॉस मराठी 3 चा उपविजेता जय दुधाणेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक.

Untitled Design (208)

Untitled Design (208)

Bigg Boss Marathi 3 runner-up Jay Dudhane arrested at Mumbai airport : ‘बिग बॉस मराठी 3’ (Big Boss Marathi) चा उपविजेता आणि प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर जय दुधाणे(Jay Dudhane) याला ठाणे पोलिसांनी अटक केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात जय दुधाणेला मुंबई(Mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली असल्याचं समजतंय. या अटकेमुळे मनोरंजनसृष्टीसह सोशल मीडियावरही एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जय दुधाणे याने बनावट कागदपत्रांच्या आधारे काही दुकानं बेकायदेशीरपणे विविध व्यक्तींना विकल्याचा आरोप आहे.

या व्यवहारांमुळे अनेक खरेदीदारांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये जय दुधाणेसह त्याच्या कुटुंबीयांचीही नावे असून आजोबा, आजी, आई आणि बहीण यांची चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जय दुधाणे हा ठाण्याचा रहिवासी असून तो जिम व्यवसायिक आहे. फिटनेस ट्रेनर, खेळाडू, मॉडेल आणि अभिनेता अशी त्याची ओळख आहे. ‘स्प्लिट्सविला 13’ या रिअॅलिटी शोमधून तो प्रथमच चर्चेत आला होता आणि या शोचं विजेतेपदही त्याने पटकावलं होतं. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सिझनमध्ये त्याने सहभाग घेतला होता, जिथे तो उपविजेता ठरला. या सिझनचं विजेतेपद विशाल निकमने पटकावलं होतं.

पात्रता नसताना निवडणूक लढवणं म्हणजे घराणेशाही; गिरीराज सावंत यांनी स्पष्टचं सांगितलं

जयने मराठी चित्रपटसृष्टीतही काम केलं आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गडद अंधार’ चित्रपटात तो झळकला होता. तसेच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. दरम्यान, अटक होण्यापूर्वी काहीच दिवसांपूर्वी जय दुधाणे वैयक्तिक आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात करताना दिसला होता. 24 डिसेंबर 2025 रोजी त्याने गर्लफ्रेंड आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलसोबत विवाह केला होता. ठाण्यात कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. लग्नाच्या अवघ्या 11 दिवसांनंतर जयला अटक झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

जयची पत्नी हर्षला पाटील ही प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती फॅशन आणि ट्रॅव्हलशी संबंधित व्हिडीओ शेअर करत असते. जय आणि हर्षला गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सध्या या फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलिसांकडून सुरू असून, नेमके आरोप काय आहेत आणि या प्रकरणाची व्याप्ती किती आहे, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Exit mobile version