Megha Dhade : अभिनयक्षेत्र आणि राजकारण यांचे फार जुने नाते आहे. अनेक अभिनेते अभिनेत्री राजकरणात प्रवेश करताना दिसतात. मागच्या काही महिन्यांपूर्वी मराठी अभिनेत्री मेघा धाडेची राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा खूपच रंगत होती. परंतु आता त्या चर्चाना पूर्ण विराम मिळाला आहे, (Bigg Boss Marathi Fame) आता प्रसिद्ध बिग बॉस मराठी अभिनेत्री मेघा धाडेने (Megha Dhade) भारतीय जनता पार्टी पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. (Bigg Boss Marathi Fame Actress Megha Dhade Joins Bjp)
बिग बॉस मराठी अभिनेत्री मेघा धाडेने भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, महामंत्री विजय चौधरी व सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रियाताई बेर्डे यांच्या यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे. तसेच तसेच ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री असलेली गार्गी फुले (Gargi Phule) यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
आजवर मराठी, दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ती नुकतीच जॉनी लिव्हरसोबत पार्टनर्स या मालिकेत देखील झळकली होती. नेहा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने ती बिग बॉसच्या घरात असताना तिला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण नुकतेच नेहाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले होते. पण आता ती भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केल्याने जोरदार चर्चेत येत आहे.
Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा
‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून मेघा धाडेला ओळखले जाते. ‘बिग बॉस’मुळे ती घराघरात पोहोचली. मेघा घाडगे ही मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेकदा ती विविध गोष्टींवर प्रतिक्रिया देताना दिसते. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची ती विजेती होती. ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून त्या शोच्या पहिल्या दिवसापासून मेघा चर्चेत होती. विशेष म्हणजे आजही तिची चर्चा चाहत्यांमध्ये रंगते.