Download App

Bigg Boss Marathi: कोणी कसेही वागा पण छोटा पुढारी मात्र सगळ्यांशी प्रेमानेच वागणार; पाहा नवा प्रोमो

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरात छोटा पुढारी घन:श्याम दरवडेसोबत घरातील सदस्य कसेही वागत असले तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच वागताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi New Season Day 12 : गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची म्हणजेच घन:श्याम दरवडेची (Chhota Pudhari) ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) घरात एन्ट्री झाली आणि पहिल्या दिवसापासून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.(Social Media) ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi New Season ) घरात छोटा पुढारी घन:श्याम दरवडेसोबत घरातील सदस्य कसेही वागत असले तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच वागताना दिसत आहे.


घन:श्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणाऱ्या या पुढाऱ्याने घरातील सर्व सदस्यांनाही आपलंस केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घन:श्याम इरिनाला म्हणतोय,”तू माझ्याशी कसंही वाग…पण मी तुझ्यासोबत प्रेमानेच वागणार”.

निक्कीनं केलं छोटा पुढारीला किस

बिग बॉसचा घरातील नवा प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी या दोघांची चांगलीच मैत्री बहरताना दिसत आहे. यामध्ये धनश्याम निक्कीला बोलतो की, तू माझ्यासोबत कसंही वाग पण मी तुझ्यासोबतच प्रेमानेच वागणार. या नव्या प्रोमोमध्ये निक्की छोटा पुढारीला घट्ट मिठी मारताना पाहायला मिळत आहे. आणि पुढे निक्की तांबोळी छोटा पुढारीला गालावर किस करतानाही पाहायला मिळत आहे. यानंतर घनश्याम मात्र लाजेने लाले-लाल झाल्याचं बघायला मिळाले आहे. यामुळे सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा होत असल्याचे दिसत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज टीव्ही टास्क पार पडणार आहे. बिग बॉस टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसत आहेत. घन:श्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसणार आहे. त्यामुळे आजचा भाग खूपच रंजक असणार आहे.

घरात वाहू लागलंय प्रेमाचं वारं

बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते, असे म्हटले जाऊ लागले. अशातच आता रॅपर आर्या देखील वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आर्याचा हार्टब्रेक होणार की वैभव तिचं प्रेम स्वीकारणार? हे येणारा काळच ठरवेल. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव आणि इरिना मजा-मस्ती करताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi: एकाहून एक जबरदस्त परफॉर्मन्स होणार; कोणता कल्लाकार सर्वोत्कृष्ट ठरणार?

अभिजीतची सुरेल ‘सुखाची श्रावणी’

सूरांचा बादशाह अभिजीत सावंतने (Abhijit Sawant) आपल्या आवाजाने सर्वांनाच वेड लावलं आहे. आज टेलिव्हिजनच्या लोकप्रिय सिंगिंग स्टारचा आवाजाची सुरेल ‘सुखाची श्रावणी’ ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही अवतरणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू झाल्यापासून निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेलची जोडी ‘बिग बॉस’प्रेमींच्या आणि नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. आज निक्की आणि अरबाजच्या अदांवर सगळे फिदा होणार आहेत.

follow us